आरारारारा! मुंबईला मुसळधार पाऊस पुन्हा झोडपणार; कोणत्या ठिकाणी पाऊस घालणार धुमाकूळ? वाचा सविस्तर
Mumbai Weather Today : मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसणार

मुंबईच्या या परिसरात मुसळधार पाऊस पडणार

मुंबई शहर आणि उपनगराचा आजचा हवामानाचा अंदाज जाणून घ्या
Mumbai Weather Today : मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील 24 तासात मुंबईच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत बुधवारी 18 जून रोजी 142.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. अशातच आज शुक्रवारी मुंबई शहरासह उपनगरात हवामानाची स्थिती काय असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
कसं आहे मुंबईतील आजचं हवामान?
पाऊस: मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात, विशेषतः दुपार आणि संध्याकाळी.
पावसाचे प्रमाण: साधारण 5 ते 20 मिमी दरम्यान, परंतु स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.
मान्सून 2025 मध्ये लवकर दाखल झाला असून, 19 जूनला सक्रिय राहिल्याने 20 जूनलाही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
तापमान:
किमान तापमान: 25-27°C
कमाल तापमान: 30-32°C