Crime News : एका ओसाड जंगलात नदीकाठी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. जेव्हा मृतदेहाची ओळख पटली, तेव्हा प्रत्येकजण थक्क झाला. हा मृतदेह बुंदेली लोकगीत गायिका लाडकुंवर उर्फ लवली मौर्या हिचा असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या दारूच्या बाटल्या, बिअर कॅन, जळालेला मोबाईल आणि एक संशयास्पद कार यामुळे हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील एका गावातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हात पाय एका बाजूला, उरलेले शरीर एका बाजूला
जेव्हा शेतकरी शेताकडे गेले, तेव्हा त्यांना धुर येताना दिसला. जवळ जाऊन पाहिले असता तिथे एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पडला होता. मृतदेहाची अवस्था इतकी भयानक होती की हात-पाय वेगळे होऊन जळाले होते आणि शरीराच्या बऱ्याचशा भागाची राख झाली होती. घटनेची माहिती मिळताच गावात एकच गोंधळ उडाला. सरपंच डॉ. जगदीश कुशवाहा यांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि अनेक पोलीस ठाण्यांची कुमक घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळ पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी पहिल्याच दृष्टिक्षेपात हत्या करून मृतदेह जाळल्याची शक्यता वर्तवली.
घटनास्थळावरून पोलिसांना अनेक संशयास्पद वस्तू मिळाल्या. जवळच असलेल्या शेतात दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिअर कॅन, चिप्सची पाकिटे आणि एक जळालेला मोबाईल सापडला. शेताच्या कुंपणात लाल रंगाच्या दुपट्ट्याचा फाटलेला तुकडाही अडकलेला दिसला. तसेच महिलेची काळ्या रंगाची चप्पलही जप्त करण्यात आली. पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, महिलेला एखाद्या वाहनातून येथे आणले असावे. तिच्यावर हल्ला केल्यानंतर मृतदेहाला आग लावून देण्यात आली, जेणेकरून ओळख आणि पुरावे दोन्ही नष्ट होतील.
हे ही वाचा : कानात स्क्रू ड्रायव्हर, डोळे काढले आणि हात पाय छाटले; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संपवल्याचा आरोप
अशी पटली मृतदेहाची ओळख
सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते, कारण चेहरा आणि शरीर पूर्णपणे जळाले होते. परंतु घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, बेपत्ता महिलेचा शोध घेणारे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. साडीचे तुकडे, पैंजण, अंगठी आणि चपलांच्या आधारे मृतदेहाची ओळख 45 वर्षीय लाडकुंवर उर्फ लवली मौर्या म्हणून पटली.
हे ही वाचा : सांगली हादरली, दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचा सुपारी देऊन खून; 24 तासात उलगडा
कुटुंबियांनी काय सांगितले?
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लाडकुंवर शुक्रवारी (8 मे) संध्याकाळी सातच्या सुमारास फोनवर बोलत घराबाहेर पडली होती, मात्र उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. आता नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, लवलीची कट करुन हत्या करण्यात आली आणि नंतर ओळख मिटवण्यासाठी मृतदेह जाळला गेला. या हत्याकांडाशी संबंधित एका पांढऱ्या रंगाच्या कारचीही चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली, नंतर रेल्वेखाली फेकले; दोन्ही पाय... भयंकर घडलं
मृत महिलेने केली होती प्रियकराची हत्या
शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास गावाजवळ एक संशयास्पद कार दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, त्या परिसरात सहसा रात्रीच्या वेळी चारचाकी वाहने येत नाहीत. आता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. मृत महिला स्वतः एका हत्येच्या प्रकरणात आरोपी राहिली होती. पोलीस रेकॉर्डनुसार, 2022 मध्ये बरुआसागर परिसरात दिनेश राय नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली होती. लाडकुंवरने आपल्या साथीदारांसह दिनेश रायला पाण्यात बुडवून मारल्याचा आरोप होता.
हे ही वाचा : 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक
दोन वर्ष काढली होती तुरुंगात
सुमारे दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर ती जामिनावर बाहेर आली होती. दिनेश राय आणि लाडकुंवर यांच्यात प्रेमसंबंधही होते, ज्यामुळे ते प्रकरण त्यावेळी खूप चर्चेत राहिले होते. आता लाडकुंवरच्या मृत्यूनंतर पोलीस जुना वाद, शत्रुत्व आणि गुन्हेगारी पैलू लक्षात घेऊन तपास करत आहेत. झाशीच्या एसपी सिटी प्रीती सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











