25 वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेवर जीव जडला, लग्नाला नकार देताच केलं भयानक कांड

मुंबई तक

• 09:01 AM • 05 Aug 2026

लखनऊमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर जुळलेल्या मैत्रीचे रूपांतर एका भीषण घटनेत झाले. इन्स्टाग्रामवरील ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. जेव्हा त्या महिलेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा त्या वेडसर प्रियकराने असं काही कृत्य केलं की सगळेच हादरुन गेले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

25 वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेवर जीव जडला

point

लग्नाला नकार देताच केलं भयानक कांड

Crime News : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर, प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने तिच्या 11 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले.  पीडित महिलेने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या 6 तासांत या अपहरणाचा उलगडा करत मुलाची सुरक्षित सुटका केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे वाचलं का?

इन्स्टाग्रामवर ओळख अन् प्रेम

मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय अजय यादव उर्फ छन्नू लाल याची सुमारे नऊ महिन्यांपूर्वी लखनऊमधील एका विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळाने दोघांमध्ये विविध कारणांवरून वाद सुरू झाले आणि महिलेने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. तरीही आरोपी तिच्यावर पुन्हा सोबत राहण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होता.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस घालणार धुमशान, काही जिल्ह्यांना मोठा अलर्ट

थेट मुलाचे अपहरण

महिलेने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर अजयने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने सूडबुद्धीने महिलेच्या 11 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याला घेऊन बहराइचला पळून गेला. मुलगा अचानक गायब झाल्याने महिला प्रचंड घाबरली आणि अजयने मुलाची हत्या केली असावी असा संशय तिला आला. तिने तात्काळ  पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल सर्व्हिलन्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता आरोपीची लोकेशन चुलंभा गावात असल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वाचा : Personal Finance: डायमंड म्हणजे Investment की Luxury? खरेदीपूर्वी जाणून घ्या सत्य

लग्नाला नकार दिला म्हणून...

पोलीस पथकाने तत्परतेने घटनास्थळी पोहोचून अजय यादवला अटक केली आणि त्याच्या तावडीतून 11 वर्षांच्या मुलाला सुखरूप सोडवले. चौकशीदरम्यान आरोपीने लग्नाला नकार दिल्यानेच मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, 3 आणि 4 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे पावणेएक वाजता अपहरणाची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्वरित कारवाई करत अवघ्या 6 तासांत आरोपीला जेरबंद करून मुलाची सुटका केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.