ड्रायव्हरचा प्रवासी महिलेवर जीव जडला, सोन्यासारख्या बायकोचा केला भयंकर शेवट

मुंबई तक

• 11:26 AM • 04 Aug 2026

एका ओला ड्रायव्हरचा प्रवासी महिलेवर जीव जडला. दोघांचं अफेअर सुरु झालं. जिच्यावर जीव जडला तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळं अडचण होती ती बायकोची. लखनऊमधील या घटनेत नेमकं काय घडलं.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ड्रायव्हरचा प्रवासी महिलेवर जीव जडला

point

सोन्यासारख्या बायकोचा केला भयंकर शेवट

Crime News : एका ओला चालकाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने हत्येनंतर पत्नीच्या अंगावरील तब्बल दहा लाख रुपयांचे दागिने प्रेयसीला दिले आणि स्वतः पोलिसांत जाऊन पत्नी हरवल्याची झाल्याची खोटी तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी सर्व्हिलन्स आणि सीडीआरच्या मदतीने तपास करत आरोपी पती उमेंद्र प्रताप आणि त्याची प्रेयसी आरती वर्मा या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दोन मोबाईल आणि चोरी केलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. लखनऊमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हरवल्याची तक्रार अन् नदीत सापडला मृतदेह

उन्नाव येथील रहिवासी असलेली अंजली सिंह ही 30 जुलैच्या रात्री संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली होती. 31 जुलै रोजी तिचा पती उमेंद्र याने रहीमाबाद पोलीस ठाण्यात ती हरवल्याची नोंद केली. त्याच दिवशी संध्याकाळी गोमती नदीत अंजलीचा मृतदेह आढळून आला. शवागृहात उमेंद्रने मृतदेहाची ओळख पटवली आणि तो तिथून फरार झाला. अंजलीचा भाऊ पुष्पेंद्र याने दिलेल्या तक्रारीनुसार, उमेंद्रचे आरती नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. अंजली या संबंधांना विरोध करत असल्यानेच उमेंद्रने प्रेयसी आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिची हत्या केली.

हे ही वाचा : 'ते' भाषण.. ट्रोलिंग आणि अमित ठाकरेंची बेधडक मुलाखत

असे जुळले प्रेमसंबंध

पोलीस चौकशीत समोर आले की, उमेंद्र गेल्या दोन वर्षांपासून लखनऊमध्ये गाडी चालवत होता. याच दरम्यान त्याची ओळख आरती वर्मा हिच्याशी झाली. आरतीचा 2018 मध्ये घटस्फोट झाला असून ती आपल्या 12 वर्षांच्या मुलासोबत वेगळी राहत होती. या प्रेमसंबंधांमधील अडसर दूर करण्यासाठीच उमेंद्रने अंजलीचा काटा काढण्याचे ठरवले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : अभिजीत दीपकेंचा लाखो डॉलरचा शिक्षण खर्च चौकशीत सापडणार?

लग्नानंतर शिक्षण सुटले

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत अंजली कला शाखेतील पदवीधर होती आणि तिला पुढे शिक्षण घ्यायचे होते, मात्र लग्नानंतर तिचे शिक्षण सुटले होते. या घटनेनंतर अंजलीचा सात वर्षांचा मुलगा पीयूष आता त्याच्या आजीसोबत उन्नाव येथे गेला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे करत आहेत.