सासरच्यांनी केला जीन्स घालायला विरोध, सुनेनं केलं नको ते; नेमकं काय घडलं?

सासरच्या मंडळींनी जिन्स घालण्यापासून रोखल्याने सुनेने टोकाचे पाऊल उचलले. सासरच्या मंडळींकडून कपड्यांवरून होणाऱ्या सततच्या वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:38 AM • 13 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सासरच्यांनी केला जीन्स घालायला विरोध

point

सुनेनं केलं नको ते

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका नवविवाहितेसंबंधी घडलेली हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गौरी प्रजापत असे मृत महिलेचे नाव असून, ती सासरच्या मंडळींकडून कपड्यांवरून होणाऱ्या सततच्या वादामुळे मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून तपास सुरू केला आहे. मध्यप्रदेशाती इंदोर परिसरातील  ही घटना आहे.

हे वाचलं का?

जीन्स घालण्यापासून रोखलं अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, गौरीचा विवाह काही वर्षांपूर्वी राहुल प्रजापत याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच कुटुंबात कपड्यांच्या निवडीवरून वाद होऊ लागले. गौरीला जीन्स घालण्यापासून सासरच्यांकडून मज्जाव केला जात असे, ज्यावरून वारंवार खटके उडत होते. याच त्रासाला कंटाळून गौरी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होती. घटनेच्या दिवशी ती आपल्या खोलीत होती; बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने पती राहुलने तिला आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या, नेमकं प्रकरण काय?

कुटुंबियांची चौकशी सुरु

प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, हे दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. घटनेची माहिती तात्काळ द्वारकापुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे.

हे ही वाचा : कल्याण : भोंदूबाबाने आईला बाहेर पाठवलं, अन् मुलीला तोकड्या कपड्यात बसवून...

छुप्या कारणांचा शोध

अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून सर्व बाजूने तपास केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार कपड्यांचा वाद आत्महत्येचे कारण असल्याचे दिसत असले, तरी यामागे अन्य काही छुपे कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. मृत गौरीचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले जात असून, पोस्ट मार्टम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे गौरीच्या माहेरच्या लोकांचा आक्रोश सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.