Crime News: 30 नोव्हेंबर रोजी लखनऊमध्ये एका 25 वर्षीय तरुणीला अनोळखी नंबरवरून एक व्हॉट्सअॅप मॅसेज आला. त्यामध्ये, अश्लील व्हिडीओ असल्याचा आरोप आहे. मॅसेज करणाऱ्या व्यक्तीने त्या तरुणीचे न्यूड फोटो मागितले. तसेच, पाच वेगवेगळ्या पद्धतीने तिला पॉर्न व्हिडीओ बनवून पाठवण्याची मागणी केली. आरोपीच्या या घाणेरड्या मागणीला पीडितेने नकार दिला. परंतु, यावर आरोपी तरुणीला म्हणाला की, "माझ्याकडे तुझे मॉर्फ केलेले फोटो आहेत. मी ते तुझ्या घरच्यांना आणि मित्रांना पाठवून तुला बदनाम करेन."
ADVERTISEMENT
तरुणीकडून घाणेरडी मागणी
आरोप सतत पीडितेला काही दिवसांतच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊ लागला. धमकी देण्यासोबतच त्या आरोपीने वारंवार पीडितेकडे शारीरिक संबधांची मागणी करण्यास सुरूवात केली. तरुणी या सगळ्याला विरोध करत असल्यामुळे त्या तरुणाने 1 डिसेंबर रोजी रात्री संतापजनक आणि घाणेरडं कृत्य केलं. त्याने, मुलीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या ओळखीच्या लोकांना पाठवले. 28 नोव्हेंबर रोजी सुद्धा आरोपीने टेलीग्रामवर तिच्याशी घाणेरडी मागणी केल्याचं पीडितेने सांगितलं.
हे ही वाचा: चाकूने वार करत तरुणीने प्रियकरालाच संपवलं! नंतर, स्वत:ला सुद्धा जखमी केलं अन्... नागपुरात प्रेमसंबंधातून भयानक घटना
ओळखीच्या व्यक्तीनेच केली बदनामी
आरोपी तरुणाच्या वागण्याला वैतागून अखेर तरुणीने पोलिसांची मदत मागितली. पीडितेने आरोपीविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव शिशिर भारद्वाज असून तो पीडितेला आधीपासूनच ओळखत असल्याचं समोर आलं. हे सत्य उघडकीस आल्यानंतर, तरुणीला सुद्धा मोठा धक्का बसला. पीडितेची बदनामी करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तिच्या ओळखीचा तरुण आहे, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.
हे ही वाचा: पोटच्या लेकानेच आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं! दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात तरुणाचं भयंकर कृत्य...
तरुणीने व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रॅम चॅट्स, नंबर, फोटो आणि व्हिडीओ पुरावे म्हणून पोलिसांकडे सोपवले. पीडितेचा जबाब आणि तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT











