Crime News: 13 ऑक्टोबर रोजी रात्री आंध्र प्रदेशातील संतरागाछी स्पेशल एक्सप्रेस ट्रेनमधून एक 35 वर्षीय महिला प्रवास करत होती. ती ट्रेन गुंटूर आणि पेद्दाकुरापाडु रेल्वे स्थानकांदरम्यान धावत होती. मात्र, त्यावेळी तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT
अनोळखी पुरुष लेडिज कोचमध्ये घुसला अन्...
खरंतर, सुरुवातीला एकटीच महिला कोचमधून प्रवास करत असल्याने तिला सुरक्षित वाटलं. मात्र, ट्रेन गुंटूर स्थानकावर थांबल्यानंतर जवळपास 40 वर्षीय अनोळखी पुरुष त्या कोचजवळ गेला आणि कोचचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. संबंधित महिलेने खिडकीतून तो महिला कोच असल्याचं सांगितलं पण, त्या व्यक्तीने तिचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने पीडितेला दरवाजा उघडण्यास सांगितलं.
धावत्या ट्रेनमध्ये पीडितेवर बलात्कार
दरवाजा उघडल्यानंतर, तो पुरुष आत घुसला आणि त्याने आतून दरवाजा बंद केला. पीडितेला नेमकं काय चाललंय, काहीच कळत नव्हतं. त्या तरुणाने लगेच त्याच्या खिशातून चाकू काढला आणि त्याने तिला धमकवण्यास सुरूवात केली. त्यानंतर, आरोपीने महिलेवर जबरदस्ती केली आणि ट्रेनमध्येच तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा: सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडितेचे कॉलेज प्रशासनावर आरोप! घटनेनंतर 'स्टाफने अंघोळ आणि कपडे बदलण्याचा सल्ला...'
5,600 रुपये आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला
इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेला मारहाण सुद्धा केली आणि तिच्याकडे असलेले 5,600 रुपये आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यावेळी, पीडित महिला काहीच करू शकली नाही. ट्रेन पेद्दाकुरापाडु स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर, त्या नराधमाने ट्रेनमधून उडी मारली आणि तिथून तो फरार झाला. त्यानंतर, त्या महिलेने आपला प्रवास पूर्ण केला आणि चारलापल्ली येथे पोहोचली.
हे ही वाचा: दोन मुलांची आई प्रियकरासोबत पळून गेली! पाच वर्षांनंतर, 'त्या' गोष्टीमुळे पुन्हा घरी आली अन्... नेमकं प्रकरण काय?
प्रकरणाचा तपास सुरू...
तिथे पोहोचल्यानंतर, महिलेने धाडस दाखवलं आणि सिकंदराबाद सरकारी रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने महिलेची तक्रार नोंदवून झीरो एफआयआरच्या आधारे, प्रकरण आंध्र प्रदेशातील नादिकुडी पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितलं की, आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्टेशन फुटेज तपासले जात आहेत.
ADVERTISEMENT
