Crime News: 80 रुपयांवरून झालेल्या किरकोळ वादातून पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे ही भयंकर घटना घडली. या प्रकरणासंबंधी 60 वर्षीय वृद्धाला न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना फेब्रुवारी 2023 मध्ये घडली असून सोमवारी (1 डिसेंबर) न्यायालयाने या घटनेसंदर्भात निर्णय दिला आहे.
ADVERTISEMENT
पतीने दारूसाठी 80 रुपये मागितले अन्...
फिर्यादी पक्षाच्या आरोपानुसार, संबंधित घटना ही 20 फेब्रुवारी 2023 रोजी घडली. घटनेच्या आरोपी दारूच्या नशेत घरी आला आणि त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीकडे दारू खरेदी करण्यासाठी 80 रुपये मागितले. त्यावेळी, पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.
हे ही वाचा: शेतातून घरी परतत असताना महिलेचा पाठलाग केला अन् वाटेत अडवून नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य!
नकार दिल्यास पत्नीची दगडाने ठेचून हत्या
पैसे देण्यासाठी पत्नीने पतीला नकार दिला असता, आरोपी प्रचंड संतापला आणि त्याने रागाच्या भरात महिलेला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर, आरोपी पतीने तिला ओढत झोपडीमध्ये नेलं आणि एका दगडाने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात, पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. यानंतर, पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. अखेर, न्यायालयाकडून आरोपीला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा: ठाणे: "लग्न करण्यासाठी आधी 21 वर्षांचा हो..." कुटुंबियांचं बोलणं मनाला लागलं अन् 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!
मित्राची निर्दयी हत्या
एका 20 वर्षीय तरुणाची त्याच्या मित्रांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पीडित तरुणाची ओळख लपवण्यासाठी त्याने त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि शेजारील महाराजगंज जिल्ह्यात फेकून दिलं. सोमवारी पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन या हत्याकांडाचा खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT











