Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीच्या दुष्कृत्यामुळे तरुणीचं लग्न मोडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणाने पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला पीडितेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. आता, पोलिसांनी तक्रारीनंतर प्रकरणाचा तपास करण्यास सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे कुटुंब मूळचे बदायू जिल्ह्यातील बिसौली पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असून ते सध्या बारादरी परिसरात राहतात. तसेच, पीडिता एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मुलीच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, अवधेश यादव नावाचा एक तरुण बऱ्याच काळापासून त्यांच्या मुलीच्या मागे लागला होता.
होणाऱ्या नवऱ्याला पीडितेचे अश्लील फोटो पाठवले अन्...
तरुणीच्या कुटुंबियांनी आरोप केला की, अवधेशने त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचे काही फोटो कसेतरी मिळवले. त्यानंतर, त्याने ते फोटो अश्लील बनवण्यासाठी मॉर्फ म्हणजे एडिट केले. इतकेच नव्हे तर, तो हे फोटो वेगवेगळ्या लोकांना पाठवून तरुणीची बदनामी करू लागला. पीडितेच्या वडिलांना याबाबत कळताच ते खूप घाबरले असल्याचं ते म्हणाले. परंतु, कुटुंबियांनी मुलीच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून प्रकरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा: मावशीसोबतच तरुणाचे प्रेमसंबंध... अखेर, मंदिरात उरकलं लग्न! अनोखं प्रेम प्रकरण चर्चेत...
अखेर, तरुणीचं लग्न मोडलं
या काळात कुटुंबातील लोकांनी तरुणीचं लग्न ठरवलं. यामुळे, आरोपी तरुण अतिशय संतापला आणि त्याने पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याच्या फोनवर तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. अचानक हे फोटो पाहून पीडितेचा होणारा नवरा आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यानंतर, तरुणीच्या कुटुंबियांसोबत सुद्धा त्यांचं बोलणं झालं परंतु परिस्थिती बिघडली आणि हे लग्न मोडलं.
हे ही वाचा: मुंबई: पालकांनो सावधान! प्रतिष्ठित शाळेत अॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक... ट्रॅफिक हवालदार निलंबित!
पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना आरोपीचं हे वागणं असह्य झालं आणि त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार नोंदवण्याचं ठरवलं. तक्रारीच्या आधारे, आरोपी तरुणाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











