Mumbai Rape Case : मुंबईच्या घाटकोपर परिसरात संतापजनक घटना घडलीय. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध करण्यात आले. त्यानंतर ती 8 महिन्यांची गर्भवती राहिली. पीडित तरुणीची प्रकृती बिघडल्यावर तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी खुलासा केला की, तरुणी 8 महिन्यांची गर्भवती आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तरुणाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पीडित तरुणी आरोपींची नावे सांगू शकत नव्हती
पीडितेनं दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी सामूहिक बलात्कार (गँगरेप) आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं रुग्णालयाजवळ राहणारा एक तरूण आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात शारीरिक संबंध केल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीची मानसिक स्थिती अस्थिर झाल्याने तिला घटनेची वेळ आणि आरोपींच्या नावाची माहिती देता आली नाही. तपासात समोर आलं की, ज्या लोकांची नावं समोर आली, त्यापैकी एकाचा जुलैमध्ये मृत्यू झालाय.
हे ही वाचा >> "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...
पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पोलिसांनी 100 हून अधिक लोकांची चौकशी केली. यामध्ये ऑटो चालक, चहा विक्रेता यांचा समावेश होता. घटनेनंतर जो आरोपी फरार झाला होता, त्याचंही नाव समोर आलं आहे. पोलिसांनी त्याला ट्रॅक करून अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी पीडितेसोबत संबंध केल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, हे सामूहिक बलात्काराचं प्रकरण नाहीय. अटक केलेल्या तरुणाला आज कोर्टात हजर केलं जाईल. या प्रकरणात आणखी कोणत्या आरोपीचा समावेश आहे, याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.
हे ही वाचा >> 3 पतींनी सोडलं..बाळ झाल्यावर प्रियकरानेही नातं संपवलं! मुंबईतील महिलेनं 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या
ADVERTISEMENT
