Rape Case: राजस्थानच्या करौली गावातून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने एनर्जी ड्रिंक पिऊन 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या सगळ्यामुळे पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिला त्याच अवस्थेत सोडून आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. काही वेळानंतर, पीडिता रक्ताने माखलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावण्यात आलं. रुग्णालयात तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
कुटुंबियांनी केली तक्रार दाखल
मुलीसोबत असं दुष्कृत्य झाल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी लगेच लोंगारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पीडिता तिच्या बहिणीच्या नातेवाईकाकडे भाजी देण्यासाठी जात होती.
हे ही वाचा: "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...
वाटेतच थांबवलं अन् पीडितेसोबत दुष्कृत्य
आरोपी मुलाने तिला वाटेतच थांबवलं आणि तिच्यासोबत दुष्कृत्य केलं. आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला त्याच अवस्थेत सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि काही तासांतच आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी आरोपीने आपल्या मित्रांसोबत तलावात अंघोळ केली होती. त्यानंतर एनर्जी ड्रिंकसोबत मद्याचं देखील सेवन केलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तीन पथके तयार केली. या पथकांनी अवघ्या 4 ते 5 तासांत आरोपीला पकडलं. सध्या, गंभीर पद्धतीने जखमी झालेल्या पीडित मुलीला उपचारांसाठी करौली रुग्णालयातून जयपूरला रेफर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: सोनं घ्या सोनं! ऑगस्ट महिना सुरु होताच ग्राहकांची सुरु झाली दिवाळी..आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाचं वातावरण आहे. गावातील लोक अल्पवयीन मुलीवर केलेल्या क्रूरतेच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत. ही घटना केवळ कायदेशीर व्यवस्थेला आव्हान देत नसून समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते.
ADVERTISEMENT
