लिव्ह इन पार्टनरचा सुटकेसमध्ये मृतदेह घेऊन दीड तास…; कुर्ल्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उलगडलं!

रोहिणी ठोंबरे

22 Nov 2023 (अपडेटेड: 22 Nov 2023, 09:24 AM)

मध्य मुंबईतील कुर्ला येथे दोन दिवसांपूर्वी एका मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. आता या घटनेचा खुलासा करत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे मृत तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Mystery murder of the young woman found in the suitcase in Kurla was revealed 22 year old man Murdered his live-in partner

Mystery murder of the young woman found in the suitcase in Kurla was revealed 22 year old man Murdered his live-in partner

follow google news

Mumbai Crime Story : मध्य मुंबईतील कुर्ला येथे दोन दिवसांपूर्वी एका तरूणीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. आता या घटनेचा खुलासा करत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे मृत तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. ही तरुणी मध्य मुंबईतील धारावी येथील रहिवासी होती. (Mystery murder of the young woman found in the suitcase in Kurla was revealed 22 year old man Murdered his live-in partner)

हे वाचलं का?

मंगळवारी (21 नोव्हेंबर) या घडलेल्या घटनेचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, रविवारी (19 नोव्हेंबर) शांती नगरमधील सीएसटी रोडवर एका अज्ञात सुटकेसमधून 25 वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडला. यानंतर कुर्ला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे युनिट-5 ही या प्रकरणाचा तपास करत आहे.

वाचा : बागेश्वर बाबाच्या दरबारात भाविकांना मारहाण, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

हत्येमागचं गूढ उलघडलं, प्रकरण नेमकं काय?

पोलीस पथकाने घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आणि गुप्तचरांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी 22 वर्षीय आरोपी आस्कर मनोज बरला याला पकडले असून तो ओडिशात पळून जाण्याच्या बेतात होता. आरोपीने शनिवारी (18 नोव्हेंबर) प्रेयसीचा गळा आवळून खून केला होता. दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. आरोपी आस्कर मनोज बरलाला आपल्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय होता. ती जिथे हाऊसकिपिंगचं काम करत होती तिथे तिचा नवीन प्रियकरही काम करतो असं त्याला वाटत होतं.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दीड तास सुटकेस घेऊन गर्दीत फिरत राहिला

प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिची हत्या केली. तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून जवळपास दीड तास तो घेऊन मुंबईच्या वर्दळीत फिरत होता. या घटेनेचा तपास करत असताना वडाळा पोलिसांना आरोपीला शोधण्यात यश आलं आहे.

वाचा : MLA Disqualification: जेठमलानींसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकाचा मराठी बाणा, सुनावणीतील खडाजंगी जशीच्या तशी..

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत केली अटक

आरोपीने सांगितले की, तो आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर प्रतिमा पावल किसपट्टा गेल्या दोन वर्षांपासून एकत्र असून सुमारे एक महिन्यापासून धारावी परिसरात राहत होते. मृत प्रतिमा हाऊसकिपिंगचं काम करायची आणि तिने काही दिवसांपूर्वी हे काम सोडले होते. आरोपी आस्कर मनोज बरला याला तिच्या चारित्र्यावर संशय होता. या सर्व गोष्टींमुळे आरोपीने हे टोकाचं पाऊल उचलत प्रेयसीला संपवलं.

वाचा : जगातील सर्वात भयंकर सीरियल किलर.. 400 मुलांवर बलात्कार करून हत्या, आता…

लॉकडाऊनदरम्यान जुळले प्रेमसंबंध

कोरोना महामारीचा काळ सुरू असताना, लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. यावेळी मुंबईतील मजूर-कामगारांनी गावाची वाट धरली. परतीच्या रेल्वे प्रवासात 2020 मध्ये मृत प्रतिमाची ओळख अस्करसोबत झाली. दोघेही एकाच गावातील होते त्यामुळे संवाद वाढला. लॉकडाऊननंतर मुंबईला येताना त्यांची पुन्हा भेट झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे आणखी जवळीक वाढली आणि ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले.

    follow whatsapp