Nashik Crime News : राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण होत आहे. 1 मे रोजी रितेश डोईफोडे नावाच्या युवकाची हल्लेखोरांनी हत्या केली. ही हत्या नाशिकरोड परिसरात झाली आहे. या हत्येचे कारण आता समोर आले आहे. ही हत्या पूर्ववैमन्यस्यातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या करणारा गुन्हेगार स्वत:हून पोलिसांना शरण गेला आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> "काश्मिरी लोकांविरोधात द्वेष...", ज्यांच्या फोटोनं देश हळहळला, 'त्या' हिमांशी नरवाल काय म्हणाल्या?
संबंधित प्रकरणात मिळालेल्या एका वृत्तानुसार, ही हत्या नाशिकरोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी दोन तरुणांवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता. या झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एकाला गंभीर जखमी करण्यात आले होते. दरम्यान, जखमी युवकावर एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्ववैमनस्यातून हत्या
जुना वाद पुन्हा काढून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालत धारधारशस्त्राने वार केले. यामध्ये रितेशचा मृत्यू झाला असून, रितेशचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
हे ही वाचा >> अमेरिका भारताच्या समर्थनात, नेव्हीसाठी 13 कोटींच्या 'या' सुरक्षा उपकरणांना मंजुरी, नौदलाची ताकद किती वाढणार?
मृत युवकाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या हल्ल्यानंतर गुन्हेगार नाशिक पोलीस ठाण्यात आले आणि शरण आले आहेत. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
