11 महिला आणि 12 पुरुष... सुरू होतं भलतंच काही, पोलिसांची एंट्री अन् खेळच खल्लास...

SPA Massage Center Viral News : जोधपूरच्या भगत कोठी पोलीस ठाणे हद्दीतील बासनी शॉपिंग सेंटरजवळ असललेल्या एका स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली.

स्पा मसाज

स्पा मसाज

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 04:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरु होतं भयंकर कृत्य

point

पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वांची झाली पळापळ

point

23 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

SPA Massage Center Viral News : जोधपूरच्या भगत कोठी पोलीस ठाणे हद्दीतील बासनी शॉपिंग सेंटरजवळ असललेल्या एका स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली. पोलिसांनी स्पा सेंटरचा दरवाजा उघडताच आत असलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.  काही लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सर्वांना घेरलं. त्यानंतर स्पा सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. 

हे वाचलं का?

त्या स्पा सेंटरमध्ये नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावावर वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी स्पा सेंटरच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची झडती घेतली. रुममधील नजारा पाहिल्यावर पोलसांनाही धक्का बसला. स्पा सेंटरमध्ये काही महिला आणि पुरुष संबंध करत होते. पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आणि 23 लोकांना ताब्यात घेतलं. यात 11 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> 'तुझ्या किडनीत स्टोन आहे..', हे शब्द ऐकून तरूणीने केलं भलतंच काही अन् अवघं कुटुंब हादरलं

पोलिसांनी सर्वांना त्यांच्या कारमध्ये बसवलं आणि भगत कोठी पोलीस ठाण्यात नेलं. नंतर आरोपींची चौकशी केली. पोलिसांनी कसून तपास केला आणि पुरावे गोळा केले. त्यानंतर सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी खूप सतर्क राहून स्पा सेंटरमध्ये धाड टाकली. पोलीस कमिश्नर राजेंद्र सिंग आणि डीसीपी राजर्षी राज वर्माने या ऑपरेशनला खूप सावधपणे प्लॅन केलं होतं. जिल्हा पश्चिमचे सेंट्रल एएसपी टीम आणि भगत कोठी पोलीस ठाण्याच्या टीमने संयुक्तपणे या स्पा सेंटरवर कारवाई केली.

हे ही वाचा >>  Personal Finance: बँक तुम्हाला देत नाही क्रेडिट कार्ड किंवा कर्ज, तर 'या' टिप्स ठरतील खूप भारी

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना आधीच संशय होता की, या स्पा सेंटरमध्ये अनैतिक कृत्य सुरु आहे. अनेक दिवस पारख ठेवल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी रेड टाकली. पोलिसांनी जोधपूरमध्ये अशाप्रकारची कारवाई याआधीही केली आहे. पोलीस कमिश्नर राजेंद्र सिंगने शहरातील सर्व स्पा सेंटर्सवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जोधपूरमध्ये कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. मागील काही महिन्यांमध्ये पोलिसांनी अशापकारच्या कारवाया केल्या आहेत. जे मसाजच्या नावावर चुकीचं काम करतात, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. 

    follow whatsapp