ढाब्यावर पोलिसांनी आवळल्या सोनमच्या मुसक्या! पती राजाची हत्या का केली? समोर आली मोठी अपडेट

मुंबई तक

• 03:09 PM • 09 Jun 2025

Raja Raghuwanshi Murder : सिक्कीममधील इंदूर येथे एक नवविवाहित तरुण राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणानंतर पत्नी सोनम बेपत्ता झाली आहे. या संबंधित प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे सोनमचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची खोलवर माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात  पोलिसांनी सोनमसह इतर 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

raja raghuwanshi murder police arrested the murderer sonam at a hotel Details of the incident came to light.

raja raghuwanshi murder police arrested the murderer sonam at a hotel Details of the incident came to light.

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सिक्कीममधील इंदूर येथे एका नवविवाहित तरुण राजा रघुवंशीचं हत्येप्रकरण

point

बेपत्ता झालेल्या सोनमचा पोलिसांनी घेतला शोध

Raja Raghuwanshi Murder : सिक्कीममधील इंदूर येथे एक नवविवाहित तरुण राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणानंतर पत्नी सोनम बेपत्ता झाली आहे. या संबंधित प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे सोनमचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची खोलवर माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात  पोलिसांनी सोनमसह इतर 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोनमचे बाहेर प्रेमसंबंध असल्याने हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सोनम पोलिसांच्या तावडीत कशी सापडली या घटनेचा घटनाक्रम पुढील प्रमाणे आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : लोणावळ्यात तरुणांनी भुशी डॅमचं कुंपण ओलांडलं, धपा धप मारल्या उड्या अन् नंतर गटांगळ्या खात...

नेमकं घडलं काय? 

रविवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास सोनम गाजीपूरच्या नंदगंज भागातील एका हॉटेलवर पोहोचली असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथून तिने एका हॉटेल मालकाला फोनद्वारे आपला भाऊ गोविंदला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करत तिने स्वत: गाजीपूर येथे असल्याचे सांगितले. या घटनेदरम्यान, गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, हॉटेल मालकाने 112 वर फोनद्वारे संपर्क साधत पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि नंतर वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले. 

अशातच आता आजतक या वृत्त वाहिनेनं सांगितलं की, पोलीस तपासातून समोर आलं की, सोनमचे लग्नापूर्वीच राज कुशवाह नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे तिने तिचा पती राजा रघुवंशीच्या खूनाचा कट रचण्यात आला आणि कटाप्रमाणे निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेघालय पोलिसांनी एसआयटी स्थापन केली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन आरोपींना इंदूर आणि एकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा : सावत्र वडिलांनी अल्पवयीन मुलीला ठेवलं बंद दाराआड, नंतर कुंटणखाण्यात...

राजा आणि सोनम हे 20 मे रोजी हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला पोहोचले होते. 23 मे रोजी दोघेही नोंगरियाट गावातील होमस्टेमधून चेक आउट केल्यानंतर बेपत्ता झाले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी 24 मे रोजी त्यांची गाडी एका सोहरिमच्या परिसरात आढळली. त्यानंतर 2 जून रोजी राजाचा मृतदेह वेइसावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत सापडला.