सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा चिरून निर्घृण हत्या! रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह...

पोलिसांना एका वृद्ध महिलेचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पीडितेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. पीडिता ही 77 वर्षीय होती आणि ती सरकारी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका होती.

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा चिरून निर्घृण हत्या!

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा चिरून निर्घृण हत्या!

मुंबई तक

• 04:44 PM • 17 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा चिरून निर्घृण हत्या!

point

रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह...

Crime News: बिहारच्या पाटणा येथून एका सरकारी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांना एका वृद्ध महिलेचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पीडितेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास 

संबंधित प्रकरण हे शास्त्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एजी कॉलनीतील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरू केला आहे. एफएसएल टीमला सुद्धा तपासासाठी घटनास्थळी बोलवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी घरातील मोलकरणीसह दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. 

हे ही वाचा: बेडरुममध्ये तरुणीचा दोन मुलांसोबत रोमान्स, पतीने रंगेहात पकडलं अन् जागेवर संपवलं, 4 महिन्यांपूर्वीच झालेलं लव्ह मॅरेज

77 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेची हत्या 

हत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून मृत महिलेचं नाव माधवी कुमारी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, तिच्या पतीचं पूर्वीच निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. ती पाटणामध्ये एकटीच राहत असून तिची दोन्ही मुले दिल्ली आणि डेहराडून येथे राहत आहेत. प्रकरणातील पीडिता ही 77 वर्षीय होती आणि ती सरकारी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका होती. महिलेच्या हत्येसोबत तिची सोन्याची चेन आणि अंगठी देखील गायब असल्याचं सांगण्यात येत आहे. आता, पोलीस या प्रकरणाचा तपास करताना चोरीच्या उद्देशाने हत्येचा अँगल विचारात घेत आहेत. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

हे ही वाचा: वहिनीचे अनैतिक संबंध, तिच्यासह प्रियकराची हत्या अन् बहिणीला सुद्धा... शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचून सरेंडर

पोलिसांनी दिली माहिती 

या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजी कॉलनीतील सी-71 नंबर घरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला. संबंधित महिलेचे पती हे एजी ऑफिसमध्ये कार्यरत होते आणि 2022 मध्ये त्यांचं निधन झालं. सध्या, पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp