मुलीचा लग्नाला नकार, वडिलांनी अवघ्या कुटुंबालाच केलं उद्ध्वस्त.. महाराष्ट्र हादरला!

हिंगोली जिल्ह्यात एका 45 वर्षीय व्यक्तीवर आपल्या 17 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.

Shocking incident in Hingoli Daughter refused to marry Father killed her by pressing a pillow on her face

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

24 Aug 2025 (अपडेटेड: 26 Aug 2025, 11:40 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीने लग्नाला नकार दिल्याने वडिलांनी केली हत्या

point

हत्येनंतर स्वत: सुद्धा आत्महत्या...

Crime News: हिंगोली जिल्ह्यात एका 45 वर्षीय व्यक्तीवर आपल्या 17 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी (20 ऑगस्ट) पीडिता झोपली असताना तिच्या वडिलांनी तिचं उशीने तोंड दाबलं अन् त्यात पीडितेचा मृत्यू झाला. संबंधित मुलीने नात्यातील एका मुलासोबत लग्नाला नकार दिल्याकारणाने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. 

हे वाचलं का?

नात्यातील मुलासोबत लग्न ठरवलं होतं..

हिंगोली जिल्ह्याचे एसपी श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैय्यद शाकेर नावाच्या एका ड्रायव्हरने नात्यातीलच एका मुलासोबत त्याच्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. मात्र, मुलगी या लग्नाच्या विरोधात होती. ठरवलेलं लग्न मोडल्याने समाजात आपली बदनामी होईल, अशी शाकेरला भिती होती. याच कारणामुळे त्याने त्याच्या मुलीची हत्या केली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पत्नीला झोपेच्या गोळ्या अन्...

मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर त्यांच्या घरात मागील तीन दिवसांपासून वाद होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरच्या पत्नीला डायबिटीज आणि उच्च रक्तदाब या स्वास्थ्यासंबंधी समस्या होत्या. आरोपीने याच गोष्टीचा फायदा उचलला आणि त्याने आपल्या पत्नीला नियमित गोळ्यांसोबत झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर, आरोपी ड्रायव्हर त्याच्या मुलीच्या खोलीत गेला आणि उशीने तिचं तोंड दाबलं. 

हे ही वाचा: इंस्टाग्रामवर झाली मैत्री, नंतर बिझनेस वाढवण्याचं आमिष... ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार!

मुलीच्या हत्येनंतर स्वत: देखील आत्महत्या...

घटनेच्या वेळी सैय्यद शाकेरची दोन मुलं झोपली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येनंतर शाकेरला त्याच्या वाईट कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्यामुळे मुलीला मारून टाकल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आधी त्याने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला आणि नंतर स्वतःच्या छातीवर वार केला. पण तो वाचला. अखेर त्याने गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. 

हे ही वाचा: कोरड्या विहिरीत आढळला मृतदेह! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीच्या हत्येची प्लॅनिंग अन् 60 वर्षांच्या पतीलाच...

प्रकरणासंदर्भात पोलिसांचा तपास 

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हिंगोलीतील सरकारी रुग्णालयात पाठवले. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. शाकीरच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp