Suicide News : आई आणि मुलाच्या नात्यासारखं नातं या जगात कुठेच नसते. पण, आता आईनेच आपल्या बाळाला जळत्या चुलीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना आहे. यातच बाळाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आईने पुढचा मागचा विचार न करता गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्रा जिल्ह्यातील जोबेदेह गावात घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पिंपरीत नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध, खुनाची दिली सुपारी, भररस्त्यातच अडवून थेट मानेवरच... धक्कादायक कांड
आईने आपल्या मुलाला जळत्या चुलीत फेकून दिले
या प्रकरणात बाभानी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक म्हणाले की, मृत महिलेची ओळख राजपती (वय 28) अशी आहे. बुधवारी ती छत्तीसगड येथील तिच्या सासरहून माहेरी आली होती. तेव्हा घरात कुटुंबीयांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले असताना, आई राजपतीने आपल्या मुलाला जळत्या चुलीत फेकून दिले असता, त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : दिल्ली स्फोटातील संशयित आरोपी डॉ. उमरचे घर केलं जमीनदोस्त, सुरक्षा दलाची कारवाई, नेमकं काय घडलं?
आईने साडीचा गळफास घेत केली आत्महत्या
मुलाच्या मृत्यूनंतर, राजपतीनेही साडीचा गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं धक्कादायक कारणंही आता समोर आलं आहे. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणं आहे की, तिचा पती दुसऱ्या ठिकाणी नोकरी करत असल्याने तिला मानसिक त्रास व्हायचा. त्यातून पीडितेनं टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











