Crime News: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे एका शेतात तरुणीचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह रक्ताने माखलेला असून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, तरुणीच्या हत्येमागचं धक्कादायक कारण उघडकीस आलं. यामुळे पोलीस सुद्धा हादरून गेले.
ADVERTISEMENT
मित्रांसोबत बोलत असल्यामुळे हत्या
तरुणी केवळ तिच्या पुरुष मित्रांसोबत बोलत असल्यामुळे तिची अशा पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली. मृत तरुणीचं नाव मैना असून मंगळवारी दुपारी शेतात तिचा मृतदेह आढळला. गळा चिरून तरुणीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचली आणि घटनेचा तपास सुरू केला.
हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत मोठ्या पदांसाठी भरती! लाखोंच्या घरात पगार अन्... कसा कराल अर्ज?
भावाने बऱ्याच मुलांसोबत बोलताना पाहिलं अन्...
मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. दरम्यान, बहिणीच्या हत्येनंतर तिचा सख्खा भाऊ शेरसिंग बेपत्ता होता. त्यानंतर, पोलिसांना तरुणीच्या लहान भावावर संशय आला. त्यामुळे, पोलिसांनी शेरसिंगला ताब्यात घेतलं आणि कठोर चौकशी करण्यात आली. यावर मृत तरुणीच्या भावाने सांगितलं की, त्याच्या वडिलांनी मैनाचं अनेकदा लग्न ठरवलं होतं. परंतु तिने प्रत्येक वेळी ठरलेलं लग्न मोडलं. चौकशीदरम्यान, शेर सिंग म्हणाला की, त्याने त्याच्या बहिणीला बऱ्याच मुलांसोबत बोलताना पाहिलं होतं. जेव्हा त्याने पीडितेला याबाबत विचारलं तेव्हा ती काहीच बोलली नाही. यामुळे, त्याने तिचा फोन तिच्याकडून हिसकावून घेतला.
हे ही वाचा: कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही, बाळराजेंचं चॅलेंज; आता अजितदादा म्हणाले,'मस्ती आलेल्या..'
बहिणीच्या गळ्यावर वार
पुढे तो म्हणाला की, मंगळवारी मैना तिचा मोबाईल मागण्यासाठी शेतात गेली होती. पीडितेची मागणी ऐकताच आरोपी शेरसिंग प्रचंड संतापला. त्याने, लगेच जवळ असलेलं हत्यार उचललं आणि बहिणीच्या गळ्यावर वार केले. यामुळे, पीडितेचा मृत्यू झाला. आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











