Indian Imam Jailed in London : अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून 12 वर्षांच्या लहान मुलींसह अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ईस्ट लंडनमधील एका भारतीय इमामाला किमान 20 वर्षांच्या कारावासासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल हलीम खान याने आपल्या धार्मिक पदाचा गैरवापर करून 2005 ते 2014 या नऊ वर्षांच्या कालावधीत मुस्लिम समाजातील सात महिला आणि मुलींचे शोषण केले, असे ब्रिटनच्या 'द इंडिपेंडंट' या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. ईस्ट लंडनच्या ओल्ड फोर्ड रोडवरील 54 वर्षीय अब्दुल हलीम खान याने पीडितांना सांगितले होते की, 'जबरदस्तीने लैंगिक कृत्य करत असताना त्याच्या अंगात 'अलौकिक आत्मा' संचारलेला होता किंवा तो त्याच्या रूपात होता,' असे ब्रिटनच्या 'स्काय न्यूज'ने वृत्त दिले आहे.
ADVERTISEMENT
लैंगिक छळ आणि बाल लैंगिक शोषण
फेब्रुवारी महिन्यात खान याला 'निर्जन ठिकाणी' पीडितांवर केलेल्या बलात्कार, लैंगिक छळ आणि बाल लैंगिक शोषणाच्या 21 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. 'बीबीसी'च्या वृत्तानुसार, खानने एका अल्पवयीन पीडितेला सांगितले होते की, तिच्या गर्भाशयाच्या कर्करोगावर (ओव्हेरियन कॅन्सर) फक्त तोच उपचार करू शकतो. त्यानंतर तो तिला आपल्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया आणि जन्मठेपेची तसेच 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा गुरुवारी (14 मे) स्नेअर्सब्रूक क्राउन कोर्टात सुनावण्यात आली.
शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती लेस्ली कुथबर्ट म्हणाले, "औचित्य आणि पवित्रतेचा आव आणून, खानने स्वतःच्या लैंगिक समाधानासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या महिलांचा अमानुष फायदा घेतला.' न्यायमूर्तींनी पुढे सांगितले की, खानने बांगलादेशी मुस्लिम समाजातील महिला आणि मुलींना लक्ष्य केले. 'हे विश्वासाचे जाणूनबुजून केलेले विकृतीकरण आहे,' असे न्यायमूर्ती म्हणाले.
हे ही वाचा : 'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये', प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे संतापजनक मागणी
बांग्लादेशी मुस्लीम महिलांना लक्ष्य
न्यायमूर्तींनी यावर भर दिला की खानने विशेषतः बांगलादेशी मुस्लिम समाजातील महिला आणि मुलींना लक्ष्य केले. इमामाच्या अधिकाराची भीती आणि लज्जेच्या भावनेमुळे पीडिता लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार करणार नाहीत, असे गृहीत धरून त्याने हे केले. यातील सर्व सात पीडिता, ज्यांच्यापैकी तीन जणी घटनेच्या वेळी अल्पवयीन मुली होत्या, त्या स्थानिक बांगलादेशी समुदायाच्या होत्या.
न्यायमूर्ती कुथबर्ट यांनी न्यायालयात खानला सांगितले, "तू जणू काही आपल्याला कोणीच स्पर्श करू शकत नाही अशा आविर्भावात वागलास. तुला खात्री होती की जर त्या समोर आल्याच, तर त्यांच्यावर नाही तर तुझ्यावरच विश्वास ठेवला जाईल." 'बीबीसी'च्या वृत्तानुसार, इमामाच्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या एका पीडितेने न्यायालयात सांगितले, "माझ्यासाठी खान हा माणूस नाही. तो दुष्टतेचे जिवंत रूप (evil personified) आहे."
हे ही वाचा : '...तर 30 मे पासून आमरण उपोषण' मनोज जरांगेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा
पीडितांनी काय सांगितले?
न्यायालयाने इतर पीडितांचे जबाबही ऐकून घेतले आणि त्या सर्वांनी या हल्ल्यांमुळे त्यांच्यावर झालेल्या गंभीर आणि हानिकारक परिणामांबद्दल सांगितले. एका पीडितेने बीबीसीला सांगितले की, जेव्हा खानने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तेव्हा ती 13 वर्षांची होती. ती पीडिता म्हणाली, "माझा खरोखरच विश्वास होता की त्याच्याकडे अलौकिक शक्ती आहेत." पीडितेने पुढे सांगितले की, खानने तिला धमकावले होते की जर तिने कधीही या शोषणाबद्दल वाच्यता केली, तर तिच्यासोबत आणि तिच्या कुटुंबासोबत "काहीतरी खूप वाईट" घडेल.
ADVERTISEMENT











