मुलीचे 'आयएएस' अधिकाऱ्यासोबत लग्न, 30 लाख रुपये उधळले अन् लग्नानंतर अवघ्या काही तासांतच...धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

22 Mar 2026 (अपडेटेड: 22 Mar 2026, 10:59 AM)

Crime News : एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचे लग्न एका 'आयएएस' अधिकाऱ्याशी लावून दिले, मात्र लग्नानंतर अवघ्या काही तासांतच तो अधिकारी तोतया असल्याचे उघड झाले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलीचे 'आयएएस' अधिकाऱ्यासोबत लग्न

point

30 लाख रुपये उधळले अन् लग्नानंतर अवघ्या काही तासांतच..

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचे लग्न एका 'आयएएस' अधिकाऱ्याशी लावून दिले, मात्र लग्नानंतर अवघ्या काही तासांतच तो अधिकारी तोतया असल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असलेल्या प्रीतमकुमार निषाद नावाच्या तरुणाने व्हॉट्सॲपवरील एका विवाह ग्रुपमध्ये स्वतःचा खोटा बायोडाटा टाकला होता. त्यात त्याने आपण आयएएस अधिकारी असल्याचे भासवले होते. या भूलथापांना बळी पडून मुलीच्या कुटुंबीयांनी आनंदाने लग्नाची तयारी केली, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

हे वाचलं का?

लग्नासाठी 30 लाख रुपये खर्च

लग्नाच्या नावाखाली या तोतयाने मोठ्या रकमेचा हुंडा मागितला होता. साखरपुड्याच्या अवघ्या तीन दिवस आधी 'लग्नाचा खर्च' म्हणून त्याने 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी 10 लाख रुपये साखरपुड्यात आणि उर्वरित 5 लाख रुपये विधींच्या दरम्यान घेण्यात आले. लग्नाचा एकूण खर्च आणि हुंडा मिळून पीडित कुटुंबाने तब्बल 30 लाख रुपये खर्च केले. 11 मार्च 2026 रोजी एका मॅरेज हॉलमध्ये हा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. वऱ्हाडी मंडळी आणि नातेवाईक उत्साहात होते, पण हा आनंद फार काळ टिकला नाही.

हे ही वाचा : अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO

लग्नानंतर अवघ्या काही तासांतच बिंग फुटले

खळबळजनक बाब म्हणजे, मुलगी सासरी गेल्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलीसमोर भयाण वास्तव समोर आले. रडत रडत नववधूने आपल्या वडिलांना फोन करून सांगितले की, तिचा पती कोणताही अधिकारी नसून एक नंबरचा फसवणूक करणारा गुन्हेगार आहे. त्याने केवळ पैशांसाठी हे लग्न केले असून, तो तिला गोव्याला नेऊन विकण्याच्या तयारीत आहे. ही बातमी ऐकताच मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. यासोबतच आरोपीने पीडितेशी गैरवर्तन आणि छेडछाड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे ही वाचा : दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद, पतीने पत्नीला बेदम मारहाण करत ठार मारलं

सोशल मीडियावरील लग्नाच्या जाहिरातींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

मुलीच्या कुटुंबाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. आरोपी प्रीतम सध्या फरार असून पोलीस त्याच्या शोधात ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. अशा प्रकारे उच्चशिक्षित अधिकारी असल्याचे भासवून लोकांची लूट करणारी एखादी मोठी टोळी सक्रिय आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावरील लग्नाच्या जाहिरातींच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.