Crime News: उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रियकराला मिळवण्याच्या नादात एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पीडित पतीची निर्घृणपणे हत्या केली. नेमकी घटना काय?
ADVERTISEMENT
हे प्रकरण अलीगढमधील छर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. 29 जुलै रोजी युसूफ नावाचा एक तरुण अचानक बेपत्ता झाला. कुटुंबियांनी त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कोणताच सुगावा हाती लागला नाही. मात्र, एका आठवड्यानंतर युसूफचा मृतदेह आढळला आणि त्यावेळी त्याची ओळख पटवणं देखील कठीण होतं. त्याची ओळख पटू नये, यासाठी शरीर अॅसिडने जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या तपासात प्रेम, विश्वासघात आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली रचलेल्या भयानक कटाचे सत्य समोर आलं.
अर्धवट जळालेला मृतदेह
युसूफ बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मोबाईल फोन सुद्धा बंद होता. रात्री उशीपर्यंत त्याचा काहीच पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी छर्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात, काहीच पुरावा हाती लागला नाही. मात्र, एका आठवड्यानंतर कासगंज जिल्ह्यातील ढोलाना परिसरात वीटभट्टीजवळ एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळाली.
गावकऱ्यांना संबंधित वीटभट्टीजवळील परिसरात दुर्गंधी येऊ लागल्यास त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी दोरीने बांधलेले हात आणि शरीराचा वरचा भाग अॅसिडने जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटवणं देखील अवघड होतं. पण पोलिसांनी मृतदेहाच्या फोटो आणि कपड्यांच्या आधारे छर्रा पोलिस ठाण्यातून बेपत्ता तरुणाची माहिती मिळवली असता युसूफचं नाव समोर आलं. युसूफच्या वडिलांनी मृतदेह पाहता क्षणी तो ओळखला आणि यानंतर त्यांनी पोलिसांना प्रकरणाबाबत माहिती दिली.
युसूफच्या पत्नीचं संशयास्पद वागणं...
युसूफच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून युसूफची पत्नी तबस्सुमचं वागणं संशयास्पद वाटू लागलं. ती तिच्या मोबाईलवर जास्त वेळ घालवत होती आणि तिच्यामुळे घरात वारंवार भांडणे व्हायची. मात्र, युसूफच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी अचानक गायब झाल्यामुळे संशय आणखी बळावला. तिचा मोबाईल फोन सुद्धा बंद होता. आश्चर्याची बाब म्हणजे, त्या दिवसापासून त्यांच्या घरात सतत येत असलेला दानिश नावाचा तरुणसुद्धा गायब होता.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचं मुंडकंच छाटलं अन्... नंतर न्यूज चॅनलला सांगितली भलतीच गोष्ट
युसूफच्या भावाने केला खुलासा
यानंतर युसूफच्या भावाने घराची झडती घेतली असता एक धक्कादायक खुलासा झाला. युसूफचा भाऊ आमिरच्या म्हणण्यानुसार, तबस्सुमच्या खोलीत ताबीज, कागदाचे तुकडे, बदाम, खजूर आणि काळे धागे सापडले. हे सर्व विशेषत: काळ्या जादूमध्ये वापरले जातात. काही कागदाच्या स्लिपवर अरबी भाषेत काहीतरी लिहिलेलं तर काहींवर तबस्सुम आणि युसूफची नावे तसेच काही विचित्र चिन्हं होती. तबस्सुमने युसूफला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी या युक्त्या वापरल्या जेणेकरून दानिशसोबतचे तिचे प्रेमसंबंध अबाधित चालू राहतील, असा कुटुंबियांनी आरोप केला आहे. या सगळ्यातून काहीच साध्य झालं नसल्यामुळे तबस्सुमने तिच्या प्रियकरासोबत मिळून युसूफची हत्या केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा: "मी तिचा पहिला रुग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर..." अभियंत्याने लिहिली 'ती' कहाणी अन् हॉटेलमध्येच संपवलं आयुष्य...
या प्रकरणासंबंधी अलिगढचे डीएसपी म्हणाले की, "युसूफ बेपत्ता तक्रार 29 जुलै रोजी नोंदवण्यात आली होती. नंतर कासगंज जिल्ह्यात एक मृतदेह आढळला ज्याची युसूफ म्हणून ओळख पटवण्यात आली. युसूफची पत्नी तबस्सुमचे दानिश नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचं तपासात दिसून आलं. नंतर, दोघांनी मिळून हत्येचा कट रचला. सध्या तबस्सुमला अटक करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून चौकशीदरम्यान तबस्सुमने ती युसूफवर नाराज होती आणि दानिशसोबत तिचे आयुष्य घालवू इच्छित असल्याचं कबूल केलं आहे."
ADVERTISEMENT
