'बायको मला निळ्या ड्रममध्ये घालून मारणार होती, त्याआधीच..' दुहेरी हत्याकांड प्रकरणी नवऱ्याची कबुली

Crime News : 'माझी पत्नी मला निळ्या ड्रममध्ये टाकून मारून टाकणार होती, तिने माझा काटा काढण्यापूर्वीच मी तिला वाटेतून हटवलं,' अशी धक्कादायक कबुली एका आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांनी तब्बल 13 महिन्यांच्या तपासानंतर एका 16 वर्षीय मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा लावला असता, 2017 मध्ये झालेल्या एका महिलेच्या खुनाचाही उलगडा झाला.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:00 PM • 13 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायको मला निळ्या ड्रममध्ये घालून मारणार होती, त्याआधीच..

point

दुहेरी हत्याकांड प्रकरणी नवऱ्याची कबुली

Crime News : 'माझी पत्नी मला निळ्या ड्रममध्ये टाकून मारून टाकणार होती, तिने माझा काटा काढण्यापूर्वीच मी तिला वाटेतून हटवलं,' अशी धक्कादायक कबुली एका आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांनी तब्बल 13 महिन्यांच्या तपासानंतर एका 16 वर्षीय मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा लावला असता, 2017 मध्ये झालेल्या एका महिलेच्या खुनाचाही उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी सलीम हुसेन आणि आसिम उर्फ डॉ. बंगाली या दोन आरोपींना अटक केली असून, हे दोघेही पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अहिल्यानगर : वर्गशिक्षकाकडून 4 विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार, नराधम न्यायालयाजवळ पोहोचताच महिलांनी झोडपलं

ऊसाच्या शेतात आढळली मानवी हाडे

या प्रकरणाची सुरुवात 8 जानेवारी 2025 रोजी झाली, जेव्हा सतवन पट्टी येथील अजीज अहमद यांनी आपली 16 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान सप्टेंबर 2025 मध्ये कैलाश नदीकाठी एका उसाच्या शेतात मानवी हाडे, कपडे आणि केसांची वेणी सापडली. डीएनए चाचणीत ती हाडे अजीज यांच्या मुलीचीच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जेव्हा मोबाइल लोकेशन आणि सीडीआर तपासला, तेव्हा गावातील सलीम हुसेनची भूमिका संशयास्पद आढळली. सलीमचा पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा निर्णय घेताच तो फरार झाला, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

एका खूनाचा तपास करताना दुसऱ्याचा उलगडा

सलीम हुसेनला पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याने अल्पवयीन मुलीला रात्री उसाच्या शेतात बोलावून तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा फोन नदीत फेकून दिला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे सलीमचा साथीदार 'डॉ. बंगाली' याने 2017 मध्ये आपल्या पत्नीचा, रजनीचाही सलीमच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले. डॉ. बंगालीने सांगितले की, त्याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते. पत्नी आपली हत्या करेल या भीतीने त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह पुरून टाकला.

हे ही वाचा : दोन मुलांचा बाप असूनही दया-माया दाखवली नाही, विकृताने चिमुकलीला दातांनी इतकं छळलं की कोमात गेली

13 महिन्यांनंतर हत्येचा छडा

डॉ. बंगाली हा मूळचा पश्चिम बंगालचा असून त्याने आरएमपी डिप्लोमा केला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची आणि पत्नीची भेट 2006 मध्ये दिल्लीत झाली होती. आरोपी सलीमवर यापूर्वीच लूटमार आणि हत्येच्या प्रयत्नासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. 13 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी या दोन्ही खुनांचा छडा लावत गुन्हेगारांना तुरुंगात धाडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून 'निळ्या ड्रम'मधील हत्येच्या भीतीची चर्चा रंगली आहे.
 

    follow whatsapp