प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट! पिस्तूलने गोळ्या झाडल्या अन्... अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना

एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पत्नीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी महिलेच्या पतीवर तिच्या प्रियकराने पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची महिती आहे.

अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना

अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना

मुंबई तक

• 01:33 PM • 07 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट!

point

पिस्तूलने गोळ्या झाडल्या अन् निर्घृण हत्या

point

अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना

Crime News: एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी महिलेच्या पतीवर तिच्या प्रियकराने पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची महिती आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून मृताच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध 

प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव अंजली असून तिला इंस्टाग्रामवर रील बनवण्याची प्रचंड आवड होती. पत्नीला हा छंद असल्यामुळे राहुलसुद्धा आपल्या पत्नीसोबत रील्स बनवायचा. दोघांनी एकत्र बऱ्याच रील्स बनवल्या आहेत. मात्र, दोघांचा सुखाचा संसार सुरू असताना सुद्धा अंजलीचं एका अजय नावाच्या तरुणावर प्रेम जडलं. तिचे अजयसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले. आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळताच, पतीने अंजलीला याचा जाब विचारला. त्यावेळी, दोघांमध्ये मोठा वाद झाला. आपल्या पतीचा अनैतिक संबंधाला विरोध असून सुद्धा अंजलीने तिच्या प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध सुरूच ठेवले. पीडित पती राहुलने आपल्या पत्नीला असं करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने पतीचं अजिबात ऐकलं नाही. शेवटी, राहुलने अंजलीच्या या कृत्याबाबत कुटुंबियांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा: "गोळ्या देऊन किंवा औषधे देऊन घातपात..." हत्येच्या कटाबाबत मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? "आरोपींचं सगळं प्लॅनिंग..."

प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट 

आपल्या अनैतिक संबंधाबद्दल कोणालाच कळू नये, यासाठी अंजलीने राहुलची हत्या करण्याची योजना आखली. यासाठी, तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली. त्यानंतर, महिलेचा प्रियकर अजयने राहुलला फोन केला आणि त्याला बोलवून घेतलं. नंतर, दोघांनी एकत्र दारूची पार्टी केली. त्यावेळी, अजयने राहुलच्या छातीवर बसून त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. भयानक पद्धतीने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा: रुग्णालयात कामाचं प्रेशर वाढलं म्हणून नर्सचा भयानक प्रताप! तब्बल 10 रुग्णांना संपवलं अन् 27 रुग्णांच्या हत्येचा प्रयत्न...

चौकशीदरम्यान सगळंच समोर आलं...

त्यानंतर, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी त्यांनी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, त्यांनी सीडीआर आणि लोकेशनचा सुद्धा शोध घेतला. याच आधारे, अंजली आणि अजयचे प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. कठोर चौकशीदरम्यान, सत्य उघडकीस आलं. मेरठ पोलिसांनी अजय आणि अंजली या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची तुरुंगात रवानगी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp