Nagpur Shocking Murder Case News : प्रियकरासोबत मिळून एका पत्नीने लकवाग्रस्त पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली. पत्नीने पतीचा गळा दाबून त्याची हत्या केली. नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. चंद्रसेन बालकृष्ण रामटेके (38) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी या हत्याप्रकरणी आरोपी दीशा आणि तिचा प्रियकर आसिफ अन्सारीला अटक केली.
ADVERTISEMENT
पत्नीने घर चालवण्यासाठी वॉटर प्लँट सुरु केला, पण नंतर..
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी त्याला लकवा मारला होता. त्यामुळे तो घरीच राहत होता. त्याची पत्नी दिशा चंद्रसेन रामटेकेनं घर चालवण्यासाठी वॉटर प्लांट सुरु केला होता. याचदरम्यान तिची ओळख स्थानिक मॅकेनिक आसिफ अन्सारी उर्फ राजा बाबू टायरवालासोबत झाली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु झाले. त्यानंतर पतीला त्याच्या पत्नीवर संशय येऊ लागला आणि घरात दोघांमध्ये वादविवाद सुरु झाले. याच गोष्टीला वैतागून दिशाने प्रियकर आसिफसोबत मिळून तिच्या पतीची हत्या केली.
हे ही वाचा >> 'त्याचे' 37 वर्षाच्या महिलेसोबत सुरू होते अनैतिक शारीरिक संबंध, पत्नीला समजलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जुलैच्या दुपारी जेव्हा चंद्रसेन घरी झोपत होता, त्यावेळी दिशा आणि आसिफने उशीने त्याचं तोंड आणि गळा दाबून हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर दिशा घरातून फरार झाली. 2 तासानंतर दिशा तिच्या घरी परतली आणि शेजाऱ्यांसोबत मिळून मृत पतीला सरकारी दवाखान्यात नेलं. तसच दिशाने पतीच्याा मृत्यूबाबत खोटी माहितीही लोकांना सांगितली. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला. दिशाने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी दिशा आणि तिचा प्रियकर आसिफ अन्सारीला अटक केली आहे.
हे ही वाचा >> वडील आणि भावाचा मृत्यू, आता बहिणीलाही.. टीम इंडियाच्या आकाश दीपची कहाणी वाचून तुम्हीही ढसाढसा रडाल!
त्या घटनेमुळंही नागपूरमध्ये उडाली होती खळबळ
कुख्यात इप्पा गँगचा एक सदस्य अरशद टोपीचं त्याच्या बॉसच्या पत्नीसोबत गुपचूप अफेअर सुरु होतं. गुरुवारी दोघेही डेटसाठी निघाले होते. तेव्हा असं काही घडलं, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बॉसच्या पत्नीच्या मृत्यूनंतर गँगमध्ये मोठी खळबळ उडाली. या गँगचे 40 सदस्यांनी टोपीला गद्दार म्हणत हत्येची धमकी दिली. टोपी फरार असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. इप्पा गँग पहिल्यापासूनच मोमिनपूरा आणि डोबी परिसरात आधीपासून सक्रिय आहे. ही गँग अंमली पदार्थांची तस्करी, हत्यारांचा अवैध व्यापार आणि किडनॅपिंगसारख्या गुन्ह्यांत सामील आहे.
ADVERTISEMENT
