दोन मुलांची आई 8 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत गेली OYO हॉटेलमध्ये, आता बस्स झालं म्हणाली अन्...

Married Woman Shocking Viral News : राजा-सोनम हनिमून प्रकरण ताजं असतानाच बंगळुरुत खळबळजनक घटना  घडली आहे.

Married Wowan Shocking Viral News

Married Wowan Shocking Viral News

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 11 Jun 2025, 03:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तीन वर्षांपासून सुरु होतं अफेअर 

point

13 वेळा महिलेवर केला चाकूने वार

point

हत्येमागचं नेमकं कारण काय?

Married Woman Shocking Viral News : राजा-सोनम हनिमून प्रकरण ताजं असतानाच बंगळुरुत खळबळजनक घटना  घडली आहे. दक्षिण बंगळुरुच्या एका हॉटेलच्या रुममध्ये 33 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी यशसला (25) अटक केली आहे. आरोपी यशसचं मृत महिलेसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे यशसने त्याची प्रेयसी हरिनीवर 13 वेळा चाकूने हल्ला केला होता. यशसने हा गुन्हा केल्यानंतर स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्याने स्वत:वरही चाकूने हल्ला केला होता. 

हे वाचलं का?

तीन वर्षांपासून सुरु होतं अफेअर 

पोलिसांच्या माहितीनुसार, हरिनीचं लग्न 2012 मध्ये दसगौडा येथील एचपीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुली आहेत. हरिणी तीन वर्षांपूर्वी यशसला यात्रेत भेटली होती. त्यानंतर दोघांमध्येही अफेअर सुरु झालं. काही महिन्यांपूर्वी दोन्ही कुटुबांतील लोकांना या अफेअरबाबत समजलं. त्यानंतर कुटुंबियांनी हरिणीला समजवलं.

हे ही वाचा >> हनिमून हत्याकांड: वडिलांचा मोठा खुलासा, 'लग्नानंतरही सोनम आणि राजामध्ये नव्हते संबंध...'

हत्येमागचं कारण काय?

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हरिणीने यशसशी बोलणं बंद केलं होतं. परंतु, काही दिवसानंतर पुन्हा दोघांमध्ये बोलणं सुरु झालं आणि शेवटचं भेटण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी म्हटलंय की, 6 जूनच्या रात्री यशसने हरिणीला त्याच्या कारमध्ये बसवलं आणि तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. 

13 वेळा महिलेवर केला चाकूने वार

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी काही वेळ एकत्र घालवला. त्यानंतर हरिणीने यशसला सांगितलं की, ती पती आणि कुटुंबाच्या दबावामुळे या नात्याला पुढे नेऊ शकत नाही. दरम्यान, यशसने हत्येचं प्लानिंक आधीच केलं होतं. तो त्याच्यासोबत चाकू घेऊन आला होता. त्याने हरिणीवर 13 वेळा वार केले आणि हॉटेलमधून पळून गेला. त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितलं की, हरिणीसोबतचं नातं संपवण्याचा निर्णय मी स्वीकारू शकलो नाही. ती जर माझ्यासोबत राहू शकत नाही, तर कुणासोबतच राहणार नाही, असंही त्याने पोलिसांना सांगितलं.

हे ही वाचा >> सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...

    follow whatsapp