Lok Sabha Election 2024 : भाजप 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल का? प्रशांत किशोरांचं मोठं भाकित

मुंबई तक

08 Apr 2024 (अपडेटेड: 08 Apr 2024, 10:21 AM)

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात, याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल प्रशांत किशोर काय म्हणाले?

प्रशांत किशोर यांचे लोकसभा निवडणुकीबद्दल भविष्यवाणी.

follow google news

Prashant Kishor Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे विधान करून भाजपचे दावे खरे ठरवले आहेत. दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये भाजप मजबूत असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

प्रशांत किशोर म्हणाले की, सत्ताधारी पक्ष भाजप दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागातही त्यांच्या जागांमध्ये आणि मतांमध्ये लक्षणीय वाढ करेल. मात्र, कर्नाटक वगळता या दोन भागात पक्ष खूपच कमकुवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप 300 हून अधिक जागा जिंकू शकतो, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला, तर केंद्रात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जादुई संख्येपेक्षा भाजप खूप पुढे असेल. 

लोकसभा निवडणुकीबद्दल प्रशांत किशोर काय म्हणाले?

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपचे स्पष्ट वर्चस्व असूनही पक्ष किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही अजिंक्य नाहीत. भाजपची जुगलबंदी रोखण्यासाठी विरोधकांकडे तीन वेगवेगळ्या आणि वास्तववादी शक्यता होत्या, पण हलगर्जीपणा आणि चुकीच्या रणनीतीमुळे त्यांनी संधी गमावली, असे त्यांनी सांगितले. 

'भाजप बंगालमध्ये नंबर वन ठरणार'

प्रशांत किशोर म्हणाले, ते (भाजप) तेलंगणात पहिला किंवा दुसरा पक्ष बनतील, ही मोठी गोष्ट आहे. ओडिशात ते निश्चितपणे नंबर वन पक्ष असतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला वाटते की पश्चिम बंगालमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष बनणार आहे. यावेळी तामिळनाडूतही भाजपला मतांच्या टक्केवारीत दुहेरी आकडा मिळू शकतो.

राहुल गांधींना प्रशांत किशोरांनी काय दिला सल्ला?

प्रशांत किशोर म्हणाले की, "राहुल गांधींना असं वाटतं की त्यांना सर्व काही माहीत आहे. मदतीची गरज आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणी मदत करू शकत नाही. राहुल गांधींना फक्त अशा व्यक्तीची गरज आहे, जी त्यांच्या (राहुल) नुसार योग्य काम करेल. हे शक्य नाही. आता त्यांनी काही काळ विश्रांती घ्यावी. जेव्हा तुम्ही गेली 10 वर्षे तेच काम करत आहात आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल, तेव्हा ब्रेक घेण्यात काही गैर नाही. तुम्ही दुसऱ्याला पाच वर्षे करू द्या. तुमच्या आईनेही असंच केलं होतं."

हेही वाचा >> "पक्ष फोडणाऱ्यांना...", देवेंद्र फडणवीसांना पवारांचा इशारा

प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींच्या त्या निर्णयाबाबत सांगितले ज्यात त्यांनी पीव्ही नरसिंह राव यांना त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राजकारणापासून दूर राहून 1991 मध्ये पदभार स्वीकारण्यास सांगितले होते. 

प्रशांत किशोर म्हणाले, जगभरातील चांगल्या नेत्यांचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्यात काय कमतरता आहे हे त्यांना माहीत आहे आणि त्या कमतरता भरून काढण्यासाठी ते सक्रियपणे प्रयत्न करतात.

हेही वाचा >> "डॉक्टर नसलो तरी, गळ्याचे, कमरेचे पट्टे काढले", शिंदेंचे ठाकरेंवर 'बाण'

प्रशांत किशोर असंही म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि नंतर ते म्हणाले होते की मी बाजूला होतो आणि दुसऱ्याला काम करू द्या. पण आज ते उलटे करत आहेत."

    follow whatsapp