Oscar 2024 मध्ये 'ओपेनहायमर'चा दबदबा, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह जिंकले 7 पुरस्कार!

रोहिणी ठोंबरे

• 12:58 PM • 11 Mar 2024

Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित 'ओपेनहायमर' (Oppenheimer) या चित्रपटाने यावर्षी 7 ऑस्कर पुरस्कार (Oscar 2024) जिंकून इतिहास रचला आहे. या चित्रपटाला केवळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीतच ऑस्कर 2024 मिळालं नाही तर, स्टार कास्ट आणि क्रू मेंबर्सलाही ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Mumbaitak
follow google news

Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित 'ओपेनहायमर' (Oppenheimer) या चित्रपटाने यावर्षी 7 ऑस्कर पुरस्कार (Oscar 2024) जिंकून इतिहास रचला आहे. या चित्रपटाला केवळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीतच ऑस्कर 2024 मिळालं नाही तर, स्टार कास्ट आणि क्रू मेंबर्सलाही ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

हे वाचलं का?

'ओपेनहायमर' चित्रपटातील आपल्या मुख्य भूमिकेने सर्वांचे मन जिंकणाऱ्या कॅलियन मर्फीला (Callian Murphy) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याचवेळी, रॉबर्ट डाउनी ज्युनियरलाही सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर 2024 पुरस्कार मिळाला आहे. 'ओपेनहायमर'ने 13 कॅटेगरींमध्ये नोमिनेशननंतर 7 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.

'Oppenheimer' ने कोणते 7 पुरस्कार जिंकले?

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - क्रिस्टोफर नोलन (ओपेनहायमर)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - किलियन मर्फी

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'ओपनहायमर'   

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रॉबर्ट डाउनी ज्युनियर, 

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंग- 'ओपनहायमर'

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - 'ओपनहायमर'

  • लुडविग गोरानसन सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर- 'ओपनहायमर'


ऑस्कर 2024 मध्ये हॉलिवूडचा जलवा

हॉलिवूडमध्ये सध्या 96 व्या अकादमी पुरस्कारांची म्हणजेच ऑस्कर 2024 ची चर्चा रंगली आहे. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संपूर्ण हॉलिवूडचा जलवा येथे पाहायला मिळाला. प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे, किलियन मर्फीला ओपेनहायमरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आलं आहे. 2023 च्या बायोपिक चित्रपट ओपेनहायमरने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. याआधी बाफ्टा अवॉर्ड्समध्येही ओपनहायमरची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली होती.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन जिमी किमेल यांनी केले. रविवारी (10 मार्च) झालेल्या पुरस्कार सोहळ्यात 'बार्बी' चित्रपटाने सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगचा पुरस्कार पटकावला. तसंच, अभिनेत्री एम्मा स्टोन हिला "पुअर थिंग्ज" साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा हा तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. 2019 मध्येही तिला "ला ला लँड" साठी ऑस्कर मिळाला होता. 

    follow whatsapp