सध्या सोशल मिडियावर अभिनेत्रींना त्यांच्या पोस्टवर कमेंट करून वाट्टेल ते बोलणे, अश्शील भाषेत कमेंट करणे हे प्रकार वाढले आहेत. मात्र अश्या उध्दट ट्रोलर्सना अभिनेत्री जुई गडकरीने चांगलाच इंगा दाखवला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या फेसबुक अकाऊंटवर तिने काही फोटो पोस्ट केले होते . त्यावर या अतिशय उध्दट व्यक्तीने अतिशय वाईट शब्दांत कमेंट केल्या. . या ट्रोलरला जुईने अतिशय सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
जुईने नुकतंच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर एका ट्रोलरने ‘सोशल मीडियावर जर तुला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर वादविवाद करणे आवश्यक आहे. अलका कुबल बनून राहशील तर तुझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. बघ प्रयत्न करून. मला अलकाजींवर टीका करायची नाही, पण इतका ताणलेला नम्र, सोज्वळ स्वभाव इकडे चालत नाही. या प्लॅटफॉर्मवर कसं सगळं हॉट पाहिजे असतं’ अशी कमेंट केली. यावर जुईने या युजरला सडेतोड उत्तर दिलं. जुई म्हणाली तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. पण मला हॉटनेसमध्ये रस नाही आणि ज्यांना मी आवडते ते माझ्याकडे नक्की बघतील. असो तुम्हाला शुभेच्छा.’ या अश्या प्रकारच्या वाईट ट्रोलिंगचा जुईला अतिशय संताप आला आहे.
ADVERTISEMENT
