Asha Bhosale Heart Attack : प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान वयाच्या 93 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?
गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका
आपल्या आवाजाने ससिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांची प्रकृती बिघडल्याची माहिती माध्यमांद्वारे समोर आली होती. प्रकृती लक्षात घेत त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात रुग्णालय व्यवस्थापकांकडून प्रकृतीची चौकीशी केली, मात्र त्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती, पण उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर काही प्रतिनिधी पोहोचले. मात्र, कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली नव्हती. आशाताईंच्या निधनाने त्यांच्या चाहत्या वर्गाने शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : नागपूर: हुंड्याच्या छळाला कंटाळून पीडितेनं ब्लँकेटनं गळफास घेत संपवलं जीवन; सासरच्यांकडून सुनेचा हुंडाबळी
आशाताई या डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत होत्या, पण उपचारादरम्यान, त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वाला मोठा हादरा बसला आहे. आपल्या संगीत क्षेत्राच्या कारकिर्दित त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये 12 हजार गाणी गायली, त्यांच्या या कामगिरीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची नोंद घेतली.
ADVERTISEMENT











