सुशांत प्रकरणात माझ्यावर आरोप करू नका- अंकिता लोखंडे

सुशांतसाठी मी कुठे चुकीची ठरलीये… मला का वाईट बोललं जातंय…? असा थेट सवाल अभिनेत्री अंकिता लोखंडेने केलाय. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्यांची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. याशिवाय अनेक चुकीच्या गोष्टींही तिच्याबद्दल बोलण्यात आल्या. मात्र या सर्व प्रकरणात आपली काहीही चूक नसल्याचं अंकिताने स्पष्ट केलंय. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला ट्रोल करत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:30 AM • 03 Mar 2021

follow google news

सुशांतसाठी मी कुठे चुकीची ठरलीये… मला का वाईट बोललं जातंय…? असा थेट सवाल अभिनेत्री अंकिता लोखंडेने केलाय. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्यांची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. याशिवाय अनेक चुकीच्या गोष्टींही तिच्याबद्दल बोलण्यात आल्या. मात्र या सर्व प्रकरणात आपली काहीही चूक नसल्याचं अंकिताने स्पष्ट केलंय.

हे वाचलं का?

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला ट्रोल करत तिच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. यावर अनेकदा अंकिताने मौन बाळगलं होतं. मात्र नुकतंच अंकिता सोशल मीडियावरून लाईव्ह आली होती आणि यावेळी तिने सुशांतच्या प्रकरणात तिला जबाबदार धरू नका असं सांगितलंय. याचप्रमाणे ज्या व्यक्तींना मी आवडत नसेन त्यांनी मला अनफॉलो करा असंही तिचं म्हणणं आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असून तिच्या डान्सचे व्हिडीयो पोस्ट करत असते. अंकिता म्हणते, “या व्हिडीयो आणि पोस्टद्वारे मी स्वतःला मोटीवेट करत असते. मात्र माझ्या आणि सुशांतच्या नात्याबद्दल माहित नसलेले अनेक लोकं माझ्यावर कमेंट करतात. जर तुम्हाला एखाद्याच्या नात्याविषयी माहिती नसेल तर त्याविषयी बोलणंही चुकीचं आहे.” त्याचप्रमाणे ज्यावेळी माझं आणि सुशांतचं नात तुटतं होतं त्यावेळी तुम्ही सगळे जणं कुठे होतात असा सवालही तिने केलाय.

सोशल मिडीयावर होत असलेल्या ट्रोलिंगकडे अंकिता लक्ष देत नाही. मात्र आपले आईवडील या इंडस्ट्रीचा भाग नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्या आईवडिलांना फार त्रास होतो, असंही तिने म्हटलंय.

    follow whatsapp