'माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट गोष्ट...जीवलग मित्र..' पाटेकरांच्या आठवणीत अशोक सराफ भावूक

मुंबई तक

• 10:17 AM • 08 Oct 2026

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील या धक्कादायक बातमीवर विश्वास बसत नसल्याचं सांगत अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

Ashok Saraf On Nana Patekar Death

Ashok Saraf On Nana Patekar Death

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट गोष्ट...जीवलग मित्र..'

point

पाटेकरांच्या आठवणीत अशोक सराफ भावूक

Ashok Saraf On Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाना पाटेकर यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील या धक्कादायक बातमीवर विश्वास बसत नसल्याचं सांगत अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मला अजूनही या धक्कादायक बातमीवर विश्वास बसत नाहीय. तसं हृदयविकाराच्या झटक्यानं त्यानं जावं असं काही कारणंच नव्हतं, कारण फिजिकली एकदम फिट माणूस, कायम स्वतःचा फिटनेस जपणारा माणूस.' एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.

हे वाचलं का?

'माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट गोष्ट'

अशोक सराफ म्हणाले की, "माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. माझा अत्यंत जवळचा, जीवलग मित्र अचानक गेला. मला अजूनही या धक्कादायक बातमीवर विश्वास बसत नाहीये. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यानं जावं असं काही कारणंच नव्हतं. कारण फिजिकली एकदम फिट माणूस, कायम स्वतःचा फिटनेस जपणारा माणूस. वाह्यात गोष्टी त्यानं कधीच केलेल्या नाहीत, अगदी शिस्तबद्ध आयुष्य जगणारा माणूस. असा अचानक जाईल, यावर विश्वासच ठेवू शकत नाही. व्यायाम करुन शरीर घडवलेला माणूस."

हे ही वाचा : 'मला अस्वस्थ वाटू लागलंय', नाना पाटेकरांनी पहाटे मित्राला कळवलं, गोव्यात काय घडलं?

'अभिनयाचा चमत्कार...'

नाना पाटेकर यांच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलताना सराफ म्हणाले की, "माझी आणि त्याची अभिनय कारकि‍र्दीची सुरुवात एकाचवेळी झाली. 'हमीदाबाईची कोठी' नाटकातून त्याने जो अभिनयाचा चमत्कार दाखवला, त्यानंतर त्याने मागे वळूनच पाहिलं नाही. अत्यंत थेट स्वभावाचा माणूस, कित्येकांना त्याचा स्वभाव नाही आवडायचा, पण एकदम थेट आणि सरळ माणूस. चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट, असा माणूस. मुळात म्हणजे, माझा मित्र जावा, हे दुःख मी कधीही विसरू शकणार नाही."

हे ही वाचा : "दादांशी आपुलकी आणि जिव्हाळा", 'तो' फोटो अन् सुनेत्रा पवार भावुक; नानांना वाहिली श्रद्धांजली

'नाना पाटेकर नावाचा नट आलाय'

नाटकातील अभिनयाविषयी बोलताना सराफ यांनी सांगितलं की, " 'हमीदाबाईची कोठी' नाटकात जेव्हा तो आला, तेव्हा त्यानं तसं वेगळं काहीच केलं नव्हतं. तो एक होतकरू नट होता; पण त्याने त्याची भूमिका अशी फुलवली, तेव्हा त्याचं नाव सगळीकडेच झालं. नाना पाटेकर नावाचा नट आलाय. पुढे त्याचं नाव कधीच मागे पडलं नाही."