Ladki Bahin Yojana Latest News: मागील वर्षी राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. सरकार डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरच्या माध्यमातून योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा करते. राज्यातील कोट्यावधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्त्याचे 1500 रुपये नवीन वर्षात 26 जानेवारीच्या आत जमा केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. परंतु, काही महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
ADVERTISEMENT
योजना सुरु झाल्यानंतर महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जात होते. त्यानंतर महायुती सरकाने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं आहे. यासाठी सरकारने काही निकष आणि अटी सांगितल्या आहेत. याच आधारावर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. परंतु, या योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> Saif Ali Khan हल्ला: आता थेट आंतरराष्ट्रीय कटाचा संशय, कोर्टानेच...
या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ
राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी काही पात्रता ठरवण्यात आल्या आहेत. ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 250000 रुपयांहून जास्त आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसच ज्या महिलांच्या कुटुंबात कोणी कर भरणारा असेल, तसच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात नोकरी करत असेल कंवा पेन्शन मिळत असेल, तर त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ज्या महिलांना सरकारी किंवा अन्य वित्तीय योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांचा लाभ मिळत आहे. त्यांनाही या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. जर एखाद्या महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतंही चारचाकी वाहन असेल, तर त्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीय.
हे ही वाचा >> Dhananjay Munde: "मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी..."; धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिला इशारा
लाखो महिला या योजनेसाठी अपात्र घोषित
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केला होता. परंतु, जेव्हा या अर्जांची छाननी करण्यात आली, त्यावेळी फक्त 2 कोटी 47 लाख महिलाच या योजनेसाठी पात्र असल्याचं समोर आलं. म्हणजेच जवळपास 16 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या. चुकीची आणि खोटी कागदपत्र देणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ADVERTISEMENT
