Crime News: महाविद्यालयात शिकणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही 15 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये घडली. त्या दिवशी, कारमध्ये असलेल्या दोन तरुणांनी आणि एका तरुणीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडित विद्यार्थीनीला बळजबरीने गाडीत बसवलं आणि चहामध्ये मादक पदार्थ मिसळून तो तिला प्यायला दिला. त्यानंतर, आरोपींनी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. इतकेच नव्हे तर, एका आरोपी तरुणीने पीडित तरुणीला चार दिवस बंदिस्त ठेवलं आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला.
ADVERTISEMENT
पीडितेने या प्रकरणासंदर्भात 22 ऑक्टोबर रोजी मडियाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी गुरुवारी घटनेतील आरोपींना अटक केली. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, घटनेतील पीडित तरुणी ही 12 वीत शिकत आहे. त्या दिवशी ती घरच्यांवर रागवून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळेच्या गेटपर्यंत पोहोचल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत बीबीडीच्या दिशेने फेरफटका मारण्यासाठी निघाली.
पीडितेला बळजबरीने कारमध्ये बसवलं...
दुपारी पुन्हा घरी परतल्यानंतर ती एकटीच गोमतीनगर येथे गेली. रात्री ऑटोमधून घरी परतत असताना खुर्रमनगरजवळ पोहोचल्यानंतर रिक्षा चालक रस्ता चुकला आणि त्यावेळी, पीडिता ऑटोतून उतरली. दरम्यान, तिच्याजवळ एक कार येऊन थांबली. त्या कारमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी होती. त्या तिघांनी पीडितेला विकास नगर पर्यंत लिफ्ट ऑफर केली. मात्र, पीडित तरुणीने त्यासाठी नकार दिला. परंतु, कारमधील तरुणीने तिला आग्रह केला आणि बळजबरीने तिला खेचून गाडीमध्ये बसवलं.
हे ही वाचा: सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पीडितेला सर्वात जास्त कॉल कोणाचे? पोलिसांनी WhatsApp चॅटही काढले
सामूहिक लैंगिक अत्याचार
त्यानंतर, आरोपींनी पीडित तरुणीला चहामध्ये मादक पदार्थ मिसळून तो प्यायला दिला. काही वेळानंतर, पीडिता कारमधून उतरली आणि आरोपी तरुणांनी तिला एका फ्लॅटमध्ये नेलं. अर्ध्या तासानंतर, आणखी एक तरुण त्या फ्लॅटमध्ये पोहोचला आणि पीडितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला.
आरोपीने फोनवरून दिली धमकी
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता घरातून गायब झाल्यानंतर कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 18 ऑक्टोबर रोजी ती घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबियांना घडलेल्या सर्व घटनेबद्दल कळालं आणि पीडितेला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. मात्र, पीडिता अतिशय घाबरली असल्याने तिने पोलिसांना तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल काहीच सांगितलं नाही. नंतर, 19 ऑक्टोबर रोजी आरोपी जुनैदने तिला फोनवरून आणि मेसेज करून धमकी दिली. अखेर, पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेतला आणि 22 ऑक्टोबर रोजी कुटुंबियांसह पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: मोठी बातमी : फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी उचललं, PSI अजूनही फरार
पोलिसांनी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी तरुण आणि तरुणीला शोध घेतला जात आहे. आता अटक झालेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे, तसेच त्यांच्याविरुद्ध प्रकरणाशी संबंधित कलमांतर्गत कारवाई केली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT











