Govindgiri Maharaj : "पप्पू नावाचं एक घुबड देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून...", गोविंदगिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका?

Govindgiri Maharaj on Rahul Gandhi: गोविंदगिरी महाराज यांनी नाव न घेता देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचं बोललं जातंय.

Mumbai Tak

मुंबई तक

07 Nov 2024 (अपडेटेड: 07 Nov 2024, 05:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधी यांचा घुबड म्हणून उल्लेख?

point

पप्पू म्हणत गोविंदगिरी महाराजांची टीका

point

गोविंदगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?

Govindgiri Maharaj on Rahul Gandhi : अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता चांगलीच चर्चा सुरू आहे. गोविंदगिरी महाराज यांनी नाव न घेता देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचं बोललं जातंय. पप्पू नावाचं एक घुबड देशात जातीपातीत(caste difference) भेद निर्माण करायचा प्रयत्न करतंय असं वक्तव्य गोविंदगिरी महाराज यांनी केलं आहे. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Sadabhau Khot : टीका करताना बरळलेल्या सदाभाऊंची दिलगिरी, म्हणाले ही गावाड्याची भाषा, ही भाषा समजण्यासाठी तुम्हाला...

 

गोविंदगिरी महाराज हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशावर वेगवेगळे संकटं असल्याचं बोलताना नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जातंय. "देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी किती विदेशी शक्ती गिधाडांसारख्या टपून बसलेल्या आहेत. लचके तोडण्यासाठी पुढे पुढे घोंगावतायत. त्यांच्यातलं एक घुबड, पप्पू नावाचं, देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून देशाच्या संस्कृतीचा नाश करण्यासाठी जातीपातीत कशाप्रकारे मतभेद निर्माण करावेत यासाठी प्रयत्न करतोय" असं वक्तव्य गोवंदिगिरी महाराज यांनी केलं आहे.

 

हे ही वाचा >>Supriya Sule : "फडणवीसांवर केस व्हावी, त्यांनी राजीनामा द्यावा"; अजितदादांची आर. आर. आबांवर टीका, सुप्रिया सुळे भडकल्या

 

दरम्यान,Govindgiri Maharaj हे अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

राहुल गांधी हे काल Mahavikas Agadhi सभेसाठी मुंबईत उपस्थित होते. राहुल गांधी येण्यापूर्वीत Devendra  Fadnavis यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचं संविधान असतंं, संविधानाच्या नावाखाली अराजकता पसवणाऱ्यांना सोबत घेऊन द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्मन असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. तसंच हा एक अर्बन नक्षलवादाचा प्रयत्न असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला होता. 

    follow whatsapp