Balu Dhanorkar : 'माझ्या मुलाला मारून टाकलं', बाळू धानोरकरांच्या आईचे गंभीर आरोप! खासदार सुनेबद्दल म्हणाल्या...

चंद्रपूर : काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी मुलाच्या मृत्यूबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

09 Nov 2024 (अपडेटेड: 09 Nov 2024, 12:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाळू धानोरकरांच्या मृत्यूबाबत अखेर आईने मौन सोडलं!

point

मोठ्या मुलाच्या उमेदवारीबाबत नेमकं काय म्हणाल्या?

चंद्रपूर : काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी मुलाच्या मृत्यूबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघात भावाचा प्रचार करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या विरोधात दीर अनिल धानोकर हे वंचितच्या तिकीटावर लढत आहेत. (regarding the death of Congress former Chandrapur MP Balu Dhanorkar serious statement by his mother Vatsala Dhanorkar

हे वाचलं का?

दीराचा प्रचार सासूबाई वत्सला धानोरकर करत असल्याने या मतदारसंघात सासू-सून आमने-सामने आहेत. यावेळी, चंद्रपूरचे माजी खासदार दिवंगत सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई यांनी काही गंभीर आरोप केले. 

हेही वाचा : Maharashtra Weather: 'आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा'; तुमच्या शहरात कसंय वातावरण?

बाळू धानोरकरांच्या मृत्यूबाबत अखेर आईने मौन सोडलं!

'खासदार बाळू धानोरकर हा लहान सहान व्यक्ती नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूची चौकशी होणे आवश्यक आहे. तेव्हा आम्ही सर्व कुटुंब दुःखात होतो. त्यामुळे तेव्हा याविषयावर काही बोलता आले नाही. मुलाच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे माझी स्थिती बरोबर नव्हती. खासदार मुलगा व पतीचा मृत्यू एकापाठोपाठ झाल्याने मनात असंख्य वेदना व दुःख होते. मुलाचा मृतदेह बघितला तेव्हा मला संशय आला. 

मात्र, दुःखात तेव्हा मी काही बोलू शकले नाही. तेव्हा पोस्टमार्टम करायला हवं होतं. मात्र ते केलं गेलं नाही. त्याला काहीतरी दिले गेले असावे अथवा विष प्रयोग केला गेला असावा, माझ्या मुलाचं जाण्याचं हे वय नव्हतं. त्याचा घातपात झाला असावा असं मला वाटतं. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं ते आम्हाला माहितीच नव्हतं. खासदार प्रतिभा धानोरकरांच्या मनात काय आहे हे कळायला मार्ग नाही. माझ्या मोठ्या मुलाचा आणि माझा ती विरोध करते', असं दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर म्हणाल्या.'
  
त्याचवेळी असे गंभीर आरोप करत असताना, या घातपातामागे कोण आहे, हे त्यांनी सांगितलेलं नाही. 

मोठ्या मुलाच्या उमेदवारीबाबत नेमकं काय म्हणाल्या?

'खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी पूर्ण ताकद लावली आणि प्रवीण काकडे यांना उमेदवारी मिळाली. मात्र, वरोरा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी दिवंगत बाळू धानोरकर यांचे मोठे भाऊ अनिल धानोरकर यांनी केली होती. काकडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे.' अशा परिस्थितीत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई धानोरकर मतदारसंघात मोठ्या मुलाचा प्रचार करत आहेत. मतदारांना हात जोडून मुलाला विजयी करा, अशी त्यांनी विनंती केली.
 


 

    follow whatsapp