नागपूर : कुख्यात गुंडाचा कारागृहात पोलीस अधिकाऱ्यावर हक्का, नंतर गुंडाचीही पोलिसांकडून धुलाई

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूर कारागृहात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड राजा गौस टोळीचा सदस्य शोएब सलीम खानने जेलमधील अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं कळतंय. या घटनेनंतर कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांनी शोएब सलीम खानला आवर घातला. यानंतर पोलिसांनी शोएब खानचीही धुलाई केली, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:53 AM • 23 Feb 2022

follow google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

नागपूर कारागृहात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड राजा गौस टोळीचा सदस्य शोएब सलीम खानने जेलमधील अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं कळतंय. या घटनेनंतर कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांनी शोएब सलीम खानला आवर घातला. यानंतर पोलिसांनी शोएब खानचीही धुलाई केली, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. अधिकारी हेमंत इंगोलेही यात जखमी झाले आहेत.

हेमंत इंगोले यांनीच केलेल्या तक्रारीवरुन शोएब खानविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्षांपूर्वी राजा गौस आपल्या चार साथीदारांसह याच कारागृहातून पळून गेला होता.

पुण्यातील मटका व्यवसायिकाची हत्या : भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सहभाग उघड, आरोपी अटकेत

गुंड शोएब सलीम खानला २०१३ पासून मकोका कायद्याच्या अंतर्गत कारागृहात कैद करण्यात आलं आहे. त्याने २०१५ साली राजा गौसच्या मदतीने जेल तोडून धूम ठोकली होती. यानंतर पोलिसांना त्याला पुन्हा अटक करुन स्वतंत्र बॅरेक मध्ये ठेवलं होतं. त्याचा राग मनात धरूनच शोएब सलीम खानने तुरुंग अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला असल्याचं निष्पन्न झालं आहे.

लग्नाचं आमिष देत घटस्फोटीत बहिणीवर अत्याचार, धमकी देऊन केला गर्भपात; भावाविरुद्ध गुन्हा दाखल

काही तरी मोठं करण्याची होती तयारी ?

काही दिवसांपूर्वी शोएब सलीम खानच्या बॅरेकची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात धारदार तार आणि काही आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. त्यामुळे तो पुन्हा काही तरी मोठं करण्याच्या तयारी होता या शंकेला वाव असल्याने जेल अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली होती.

कोल्हापूर : घरगुती वादातून उच्चशिक्षीत मुलीने केला वडिलांचा खुन, स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

    follow whatsapp