ADVERTISEMENT
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी रिलायन्स जियो इन्फोकॉम कंपनीचे अध्यक्ष आहेत.
याआधी 30 वर्षीय आकाश अंबानी बोर्डमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते.
आकाश अंबानी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला.
आकाश यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून घेतलं.
‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ मुंबईत उघडली होती.
एका मुलाखतीत आकाश अंबानींनी सांगितलं होतं की, ’11वीच्या वर्गात रिलायन्स इंडस्ट्रीजवर निबंध लिहिण्यास सांगेपर्यंत त्यांना त्याचे कुटुंब किती श्रीमंत आहे हे माहित नव्हते.’
या शाळेत बहुतेक सेलिब्रिटींची मुलं शिकायला येतात. 2003 मध्ये या शाळेला नंबर वन इंटरनॅशनल स्कूलचा किताबही मिळाला.
आकाश अंबानी यांनी ब्राउन युनिव्हर्सिटी, प्रोव्हिडन्स, रोड आयलंड येथून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.
Jio ची 4G इको सिस्टीम उभारण्याचे श्रेय मुख्यत्वे आकाश अंबानी यांना दिलं जातं.
ADVERTISEMENT
