केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरे- बॅरिकेड तोडले; सिसोदिया म्हणाले- ‘भाजपच्या गुंडांकडून तोडफोड’

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली की, ‘काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अडथळे (security barrier) तोडले. याशिवाय गेटवरील बूम बॅरिअर्सही तोडण्यात आले आहेत.’ ‘भाजपच्या गुंडांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:42 AM • 30 Mar 2022

follow google news

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली की, ‘काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अडथळे (security barrier) तोडले. याशिवाय गेटवरील बूम बॅरिअर्सही तोडण्यात आले आहेत.’

हे वाचलं का?

‘भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे.’ असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. ‘एवढेच नाही तर भाजप पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी ते त्यांना दारापर्यंत घेऊन आले.’ असाही आरोप सिसोदिया यांनी यावेळी केला आहे.

भाजपला केजरीवालांना मारायचे आहे: सिसोदिया

मनीष सिसोदिया म्हणाले, ‘भाजपला अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर एका सुनियोजित षडयंत्राखाली हल्ला करण्यात आला असून त्यांना निवडणुकीत पराभूत करता येत नाही, त्यामुळे त्यांना आता असे संपवायचे आहे.’

तेजस्वी सूर्या म्हणालेले- केजरीवाल यांनी माफी मागावी

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या म्हणाले की, ‘केजरीवाल यांना देशातील हिंदूंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी लागेल आणि जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत. युवा मोर्चा त्यांना सोडणार नाही. देशातील हिंदूंचा अपमान करणारे केजरीवाल यांना आज आपण समाजकंटक वाटत आहोत आणि काश्मिरी हिंदूंची कत्तल करणारे दहशतवादी प्रिय वाटत आहेत.

70 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली. द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत केजरीवाल यांच्या विधानाविरोधात हे निदर्शने ठेवण्यात आले होते. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. त्यांनी दरवाजावर रंगरंगोटी केली आणि येथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 70 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Goa Conclave: ‘तेव्हा अमित शाहांनी आमच्या लोकांना तोडण्याचा बराच प्रयत्न केलेला पण…’, केजरीवाल यांचा गंभीर आरोप

‘आप’चा भाजपवर आरोप

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आज भाजपचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या निदर्शनानंतर तोडफोडीची घटना समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp