‘राणा यांचा राम कोण?’; फडणवीसांचा उल्लेख, बच्चू कडूंना सल्ला, ‘सामना’त काय म्हटलंय?

मुंबई तक

03 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

अमरावतील जिल्ह्यातील सत्ताधारी बाकावरील दोन आमदार सध्या आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचं सांगितलं गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा दोघांमध्ये बिनसलं आहे. आता या वादावर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात समेट घडवून […]

Mumbaitak
follow google news

अमरावतील जिल्ह्यातील सत्ताधारी बाकावरील दोन आमदार सध्या आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचं सांगितलं गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा दोघांमध्ये बिनसलं आहे. आता या वादावर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाष्य केलंय.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात समेट घडवून आणला. पण, एक दिवस लोटत नाही, तोच दोघांमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडलीये.

बच्चू कडूंनी पुन्हा सोडणार नाही, असं म्हणताच रवी राणांनी घरात घुसून मारू, असा पलटवार केलाय. आता याच वादावर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय.

Bacchu Kadu :” मी ५ तारखेला घरात आहे, तू..” रवी राणांना इशारा

सामनातून बच्चू कडूंची पाठराखण?

सामना अग्रलेखात म्हटलंय की, “बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱ्यांचा कैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते. हे आता सहन करता येणार नाही”, असं म्हटलंय.

“कडू यांनी अपंगांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले, पण एकदा गुवाहटीला गेल्याने त्या कामावर बदनामीचे ‘खोके’ पडले”, असं भाष्य सामनातून करण्यात आलंय. त्यामुळे बच्चू कडू यांची पाठराखण सामनातून करण्यात आलीये का? या प्रश्नानं डोकं वर काढलंय.

‘राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण?’; सामना अग्रलेखात काय?

रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल”, असं म्हणत सामनातून बच्चू कडूंना राणांच्या पाठिशी कोण आहेत, याचा शोध घेण्याचा सल्ला ठाकरेंच्या सामनातून देण्यात आलाय.

“काळाने सूड घ्यायला सुरूवात केलीये”

सामनात असंही म्हटलंय की, “आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नातं जुळवायचं म्हटलं तरी लोक मागे हटतील. काळानं सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?”

    follow whatsapp