Trending : 17 व्या वर्षी पहिलं घर ते आता 37 घरांचे मालक : कमाई वाचून व्हाल थक्क

मुंबई तक

• 08:13 AM • 20 Mar 2023

Property Success | Trending : एखादा माणूस स्वतःच्या पायावर उभं राहुन कमी वयात किती यशस्वी होऊ शकतो याची अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. असंच एक उदाहरण ऑस्ट्रेलियातून समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरियामधील गोरो गुप्ता नावाच्या माणसाची ही गोष्ट. गोरो गुप्ता यांनी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचं पहिलं घर घेतलं होतं. त्यानंतर आता आज याच […]

Mumbaitak
follow google news

Property Success | Trending :

हे वाचलं का?

एखादा माणूस स्वतःच्या पायावर उभं राहुन कमी वयात किती यशस्वी होऊ शकतो याची अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. असंच एक उदाहरण ऑस्ट्रेलियातून समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरियामधील गोरो गुप्ता नावाच्या माणसाची ही गोष्ट. गोरो गुप्ता यांनी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचं पहिलं घर घेतलं होतं. त्यानंतर आता आज याच व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीची तब्बल ३७ घरं आहेत. नेमकी कशी हे आपण आज पाहणार आहोत. (A man bought his first house at the age of just 17. But, now this person has 37 houses.)

गोरो गुप्ता हे प्रॉपर्टी एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. पॉडकास्ट शोमध्ये ते लोकांना प्रॉपर्टीशी संबंधित टिप्स देताना दिसतात. news.com.au च्या रिपोर्टनुसार, गोरो गुप्ता यांचं महिन्याचं उत्पन्न तब्बल 13 लाख रुपयांच्या घरात आहे. गोरो गुप्ता व्यवसायाच्या संदर्भात ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया आणि गोल्ड कोस्टमध्ये स्थायिक आहेत. त्यांची यशोगाथा अनेकांना प्रभावित करत आहे.

गोरो गुप्ता यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी वडिलांच्या मदतीने पहिले घर विकत घेतले होते. आता गोरो गुप्ता ४० वर्षांचे आहेत. यात गेल्या १० वर्षात ते १० मालमत्तांचे मालक बनले आहेत. दरम्यान, त्यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑफसेट कर्जाचा वापर केला. यामुळेच त्यांनी एकामागून एक मालमत्ता खरेदी केली. त्यांच्या यशामागे त्याच्या पालकांचाही हात असल्याचे गोरो गुप्ता यांनी सांगितले.

Viral Video : पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या ‘त्या’ कृत्यावर यूजर्स प्रचंड संतापले!

सुरुवातीला त्यांनीच त्यांना घर घेण्यासाठी पैशांची मदत केली होती. ही घरे खरेदी करण्यासाठी त्यांनी ऑफसेट लोन घेतल्याचे गोरो गुप्ता यांनी सांगितले. गोरो म्हणाले की जर तुम्हाला ते कसे वापरायचे (ऑफसेट कर्ज) माहित असेल तर तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत कर्ज परत करू शकता. यावेळी “लोकांनी त्या मालमत्तेत गुंतवणूक करावी, ज्यामध्ये पैसा खूप वेगाने वाढतो”, असा सल्ला गोरो गुप्ता यांनी दिला. गोरो व्यावसायिक मालमत्तेचा संदर्भ देतात. तसंच लोकांना अर्थविषयक सल्लेही देतात. यामुळेच ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक जगतात ते नावाजलेले आहेत.

    follow whatsapp