उद्धव ठाकरेंनी सांगावं गुवाहाटीत आलेला कोणता आमदार तुमच्या संपर्कात? एकनाथ शिंदे यांचं आव्हान

मुंबई तक

• 08:27 AM • 28 Jun 2022

गुवाहाटीत आलेले कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ते सांगावं. कारण असं काहीही नाही. आम्ही सगळे एक आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आज रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जर उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावं सांगावीत असं थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. लवकरच आम्ही मुंबईत परतणार आहोत असं […]

Mumbaitak
follow google news

गुवाहाटीत आलेले कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ते सांगावं. कारण असं काहीही नाही. आम्ही सगळे एक आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आज रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जर उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावं सांगावीत असं थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

हे वाचलं का?

लवकरच आम्ही मुंबईत परतणार आहोत असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगतिलं आहे. आज आसाममधल्या गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दीपक केसरकर हे आमच्या गटाचे प्रवक्ते आहेत ते तुम्हाला सगळी माहिती देतील. स्वतःचा स्वार्थ साधून राजकारण करणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेत आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत होते की ४०-५० लोक आपल्या स्वार्थाकरिता या ठिकाणी आलेले नाहीत. हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही सगळे सोबत आहोत.. आम्ही कुणाच्याही संपर्कात नाही. संपर्कात असल्याचे दावे खोटे आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात कुणीही नाही. कोण आहेत त्यांची नावं सांगा असंही एकनाथ शिंदे यांनी विचारलं आहे.

एवढंच नाही तर आम्ही लवकरच मुंबईत जाणार आहोत. आम्ही सगळे मुंबईला लवकरात लवकर जाऊ त्याची कुणीही काळजी करू नका असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलेल्या दिवसापासून पहिल्यांदाच हॉटेल्या प्रांगणात येत तिथे हजर असलेल्या मीडियाशी संवाद साधला. आम्हीच शिवसेना आणि शिवसैनिकच आहोत. हेदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जातो आहोत. लवकरच आमची रणनीती ठरणार आहे. पुढे काय घडणार ते आम्ही आमचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या मार्फत तुम्हाला सांगू असंही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं.

    follow whatsapp