यवतमाळ: वाढत्या कोरोनाला लगाम लागावा यासाठी प्रशासनाने आता कडक पावलं उचलण्यासाठी सुरुवात केली आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात 13 प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करण्यात आले आहेत. यात पुसद, पांढरकवडा, यवतमाळ शहरातील भागांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 15 हजार 970 एवढी झाली आहे. तर 929 अॅक्टिव्ह रुग्ण असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय जिल्ह्यातील मृतकांचा आकडा हा 446 वर जाऊन पोहचला आहे.
पुसद, यवतमाळ, पांढरकवडा शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाला लगाम लावण्यासाठी प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतल्या जात आहे. ज्या भागात ज्यास्त रुग्ण आहे तो भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार यवतमाळ शहरात 2, पांढरकवडा 4 आणि पुसद शहरातील 7 परिसर हे कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. यावेळी हे परिसर सर्व बाजूने सील करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर निघण्यास मनाई आहे.
ही बातमी देखील पाहा: धक्कादायक ! अमरावतीमधील ६० टक्के परिसर कोरोनाबाधित
यवतमाळ, अमरावती आणि अकोला या तीन जिल्ह्यात अत्यंत झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
ADVERTISEMENT
