‘आकडेवारी हा जरी विषय असला तरी…’; धनुष्यबाण चिन्हाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात शिवसेना कोणाची आणि पक्षाच्या चिन्हासाठी लढाई सुरु आहे. सध्या याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी हा निर्णय निष्पक्ष व्हावा अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी पक्षाची स्थापना केली . ज्यांनी पक्ष […]

Mumbai Tak

मुंबई तक

08 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:47 AM)

follow google news

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात शिवसेना कोणाची आणि पक्षाच्या चिन्हासाठी लढाई सुरु आहे. सध्या याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी हा निर्णय निष्पक्ष व्हावा अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी पक्षाची स्थापना केली . ज्यांनी पक्ष वाढवला, त्यांचा विचार केला जावा, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हे वाचलं का?

अशोक चव्हाण म्हणाले, निष्पक्ष निर्णय होणं अपेक्षित आहे

धनुष्यबाण चिन्हांबाबत प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले, यात निष्पक्ष निर्णय होणं अपेक्षित आहे. कारण शेवटी ज्यांनी पक्षाची स्थापना केली, ज्यांनी पक्ष जोपासला, वाढवला, त्यांचा विचार केला जावा. जनभावना लक्षात घेतल्या पाहिजे. आकडेवारी हा जरी विषय असला तरी जनमताचा विचार करून निष्पक्ष निर्णय व्हावा अशी अपेक्षा असल्याचे चव्हाण म्हणाले.

शिंदे गटाकडून शुक्रवारी कागदपत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे सादर

शिंदे गटाकडून शुक्रवारी कागदपत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला कागदपत्रं आणि आपली बाजू मांडण्यासाठी (शनिवारी) म्हणजे आज दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेण्याची चिन्हं वाढली आहेत.

धान्यष्यबाण हा चिन्ह कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विविध चर्चाना यावेळी उधाण आलं आहे. अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत चिन्ह महत्वाचं

एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपकडून मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळतं का? की, निवडणूक आयोग चिन्ह गोठवतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत निवडणूक आयोग आज काय निर्णय देतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    follow whatsapp