‘राजानं ऐकावं, शेवटी विजय ‘सत्या’चाच होणार’, संजय राऊतांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं ट्विट

मुंबई: शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर ४ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:12 PM • 01 Aug 2022

follow google news

मुंबई: शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर ४ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरती जहरी टीका केली होती. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संजय राऊतांच्या सपोर्टमध्ये ट्विट केले आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांच्याबाबत काय म्हणाले?

”’राजा’चा संदेश स्पष्ट आहे – जो माझ्याविरुद्ध बोलेल त्याला त्रास होईल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे आणि सत्य लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण तानाशहानं ऐकावं, शेवटी ‘सत्या’चाच विजय होतो आणि अहंकार हरतो.” अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या अटकेवर देशाभरातून आवाज उठवला जात असल्याचे दिसत आहे.

संजय राऊतांच्या कारवाईवरती उद्धव ठाकरे काय म्हणाले?

संजय राऊत यांची चूक काय? त्यांचा गुन्हा काय? त्यांना अटक करण्यात आली आहे. आज मी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सध्याचं राजकारण अत्यंत घृणास्पद पद्धतीने सुरू आहे. भाजपचं राजकारण हे अत्यंत घृणास्पद आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

जया बच्चन यांचीही प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईवर सपा खासदार जया बच्चन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना 11 लाख रुपयांत विकत घेतले जात असून संजय राऊत यांना 11 लाख रुपयांसाठी अटक केली जात आहे असे वक्तव्य जया बच्चन यांनी केले आहे.

    follow whatsapp