महागाई विरोधात काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

• 08:14 AM • 05 Aug 2022

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधाता काँग्रेसने आंदोलन केलं. देशव्यापी आंदोलन करण्यास सुरूवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. अशात आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आंदोलन […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधाता काँग्रेसने आंदोलन केलं. देशव्यापी आंदोलन करण्यास सुरूवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. अशात आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे वाचलं का?

देशभरात महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

दिल्ली, नागपूर, मुंबई यासह संपूर्ण राज्यभरात काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न यासाठी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येते आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता. संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. मात्र दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा रोखला आणि राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं.

केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतलं. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली.

विरोधकांच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जाताहेत; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“विरोधी पक्ष देशातील स्वायत्त संस्थांच्या बळावर विरोधक लढत असतात. पण या सर्वच संस्थावर आज सरकारने आपले लोक बसवून ठेवले आहेत. प्रत्येक संस्थांमध्ये आरएसएसची माणसं आहेत. जेव्हा आमचं सरकार होतं. तेव्हा आम्ही ते नियंत्रित करत नव्हतो. त्यामुळे आज जर कुणी दुसऱ्या पक्षाला समर्थन देत असेल, तर त्याच्याविरोधात ईडी, इतर चौकशा लावल्या जातात, त्यामुळे विरोधक उभे राहत आहेत. पण हवा तितका प्रभाव टाकू शकत नाहीये,” अशी टीका राहुल गांधींनी केली.

मोदी सरकार म्हणतंय हे खरं नाही; कोविड मृतांच्या आकड्यावरून राहुल गांधींची टीका

“वास्तव वेगळं आहे आणि दाखवलं वेगळं जातंय. स्टार्ट अप इंडिया आज कुठे आहे. स्टार्ट अप इंडिया आज लोकांना रस्त्यावर आणत आहे. कोविड काळात कुणीही मेले नाहीत, असं सरकार सांगत आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगतेय की ५ कोटी लोक मेले आहेत. तर सरकार सांगतंय की हे खरं नाही. बेरोजगारी वाढत आहे, सरकार म्हणतंय हे खरं नाही. महागाई वाढतेय अर्थमंत्री म्हणतात, हे खरं नाही,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

    follow whatsapp