गडचिरोली: प्रियंका गांधी पहिल्यांदाच येणार गडचिरोलीत, ‘हे’ आहे कारण
व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात प्रियंका गांधी यांची सभा देखील होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी याआधी ‘मै लडकी हू, लड सकती हू’ असा नारा […]
ADVERTISEMENT

व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात प्रियंका गांधी यांची सभा देखील होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
प्रियंका गांधी यांनी याआधी ‘मै लडकी हू, लड सकती हू’ असा नारा दिला होता. महिलांच्या मजबुतीसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात सातत्याने प्रियांका गांधी रस्त्यावर उतरून काम करताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील महिला आणि युवतींसोबत त्या संवाद साधणार आहेत.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे नाहीत. त्यामुले हाताला काम नसल्याने अनेक कुटुंब हे अत्यंत बिकट परिस्थितीत आपलं जीवन व्यतित करत आहेत. हलाखीच्या परिस्थितीमुळे अजूनही काही मुली महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीत.
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील विद्यार्थिनींची अडचण दूर व्हावी त्यांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी म्हणून दहा हजार विद्यार्थिनींना प्रत्येकी 14 हजार रुपयाची इलेक्ट्रिक सायकल सीएसआर फंडातून वितरित केली जाणार आहे.