हद्दच झाली! सायबर चोराने आमदारांनाही सोडलं नाही, चार महिला आमदारांकडून उकळले पैसे

वाढत्या इंटरनेट वापरामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले. गेल्या काही महिन्यांत सायबर गुन्हेगारीच्या घटनांत लक्षवेधी वाढ झाली असून, आता राज्यातील चार महिला आमदारांनाच गंडा घातल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणात आता पुण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत आपण सर्वसामान्यांची ऑनलाइन बसूनच झाल्याचं ऐकलं असेल, मात्र आता आमदारांचीसुद्धा ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय. […]

Mumbai Tak

मुंबई तक

19 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

follow google news

वाढत्या इंटरनेट वापरामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले. गेल्या काही महिन्यांत सायबर गुन्हेगारीच्या घटनांत लक्षवेधी वाढ झाली असून, आता राज्यातील चार महिला आमदारांनाच गंडा घातल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणात आता पुण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

आतापर्यंत आपण सर्वसामान्यांची ऑनलाइन बसूनच झाल्याचं ऐकलं असेल, मात्र आता आमदारांचीसुद्धा ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय. सायबर चोरट्यांनी राज्यातील चार महिला आमदारांना गंडा घातला आहे.

आई आजारी आहे असं सांगून चोरट्याने आमदारांकडून पैसे उकळले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मुकेश राठोड या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातल्या चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची प्रकार समोर आला. याप्रकरणी पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती.

लोकप्रतिनिधी म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची मदत मागत असतात आणि त्यामुळे एका तरुणाचा फोन आला आणि त्यांनी त्याची आई आजारी असल्याचा सांगत पैशांचे मागणी केली. त्यामुळे कारण ऐकून तातडीने त्याला पैसे पाठवले मात्र त्यानंतर अशीच फसवणूक इतर महिला आमदारांची पण झाल्याचं लक्षात आल्यानंतर याबाबत तक्रार दिली असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून ४ हजार रुपये उकळले होते. गुगलपेच्या माध्यमातून पैसे दिले असल्याचं मिसाळ यांनी सांगितल आहे. दरम्यान, या प्रकरणाचा आता अधिक तपास पोलीस करत आहेत. आमदारांसोबतच फसवणुकीचा प्रकार घडल्याने नागरिकांसोबत लोकप्रतिनिधीनी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.

आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

१) सरकारी संस्था, बँका किंवा व्यावसायिक संस्था मेसेज द्वारे कधीही वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती (एटीएम पिन, ओटीटी, एटीएम कार्डचा नंबर) मागत नाही.

२) सायबर गुन्हेगार कधीही त्यांचं खरं नाव सांगत नाही. तुम्हाला आलेला कॉल आणि बोलणाऱ्याच्या आवाजावरून कॉलची सत्यता पडताळून घ्या.

३) ईमेलवर वा मेसेजवर पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर अशा मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवरही कॉल करू नका.

४) असे मेसेज डिलीट करा आणि अशा स्वरुपाचे मेसेज पाठवणाऱ्याला ब्लॉक करा. त्याचबरोबर खोटी प्रलोभनं देणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका.

    follow whatsapp