देहू: ‘फडणवीस स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात’, अजितदादांना भाषण न करु दिल्याने NCP नेत्या भडकल्या

मुंबई: ‘फडणवीस साहेब हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानाला याचं भान असणं आवश्यक होतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर नाही तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी टीका केली […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 12:25 PM • 14 Jun 2022

follow google news

मुंबई: ‘फडणवीस साहेब हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानाला याचं भान असणं आवश्यक होतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर नाही तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे.

हे वाचलं का?

देहूमधील कार्यक्रमात फक्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचीच भाषणं झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वगळण्यात आलं. त्यांना भाषणाची संधीच देण्यात आली नाही. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत. साम टीव्हीशी बोलताना विद्या चव्हाण यांनी देखील पंतप्रधानांवर टीका केली आहे.

पाहा विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या:

‘फडणवीस साहेब हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानाला याचं भान असणं आवश्यक होतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर नाही तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं. मात्र, त्यांनी ते करु दिलेलं नाही.’ अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली.

‘म्हणजे, मला असं वाटतं आजही मोदींचं 8 वर्ष तुम्ही सेलिब्रेट करत आहात. पण मोदी आजही हे देशाचे पंतप्रधान नसून गुजरातचेच पंतप्रधान आहेत. ते फक्त महाविकास आघाडी महाराष्ट्रात आली आहे तर त्यांना खूप खुपतंय हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे.’ असं म्हणत विद्या चव्हाण यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली.

‘त्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सन्मानाची वागणूक देणं हे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. आता असे बरेच कर्तव्य ते विसरतायेत किंवा ते जाणूनबुजून करत आहेत. हे आता संपूर्ण देशाच्या लक्षात आलं आहे.’ असा आरोपच विद्या चव्हाण यांनी केला.

‘मला असं वाटतं की, लोकांनीच दाखवून दिलं पाहिजे. गेल्या 75 वर्षामध्ये देशाची प्रगती केलेली असताना या देशाला अधोगतीकडे नेणारे पंतप्रधान आपण कशाप्रकारे आपल्या देशातील वागतायेत हे लोकांच्या लक्षात यायला हरकत नाही.’ असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

SPG जवानांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरण्यास सांगितले, कारण…

देहूमध्ये नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (14 जून) देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी राज्यभरातून वारकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. परंतु सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. परंतु अजित पवार तुम्ही बोला म्हणाले.

या सगळ्यानंतर आता एक मोठा वाद सुरु झाला आहे. घडलेल्या प्रकारावरुन भाजपवर सध्या टीकेची झोड उठवली जात आहे.

    follow whatsapp