बेकायदा धर्मांतरण प्रकरणी धीरज देशमुख या तरूणाला यवतमाळमधून यूपी एटीएसने केली अटक

मुंबई तक

• 01:45 AM • 02 Oct 2021

बेकायदा धर्मांतरण प्रकरणी धीरज देशमुख या तरूणाला यवतमाळमधून अटक करण्यात आली आहे. यूपी एटीएसने ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. विविध राज्यांमधून या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दीकी यांच्याहीत महाराष्ट्र नेटवर्कमधून रामेश्वर कावडे उर्फ आदम, अॅडम, मुस्तफा, देवीदास मानकर, कौशल […]

Mumbaitak
follow google news

बेकायदा धर्मांतरण प्रकरणी धीरज देशमुख या तरूणाला यवतमाळमधून अटक करण्यात आली आहे. यूपी एटीएसने ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. विविध राज्यांमधून या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दीकी यांच्याहीत महाराष्ट्र नेटवर्कमधून रामेश्वर कावडे उर्फ आदम, अॅडम, मुस्तफा, देवीदास मानकर, कौशल आलम, शौकत अली खान ही काही प्रमुख नावं आहेत.

हे वाचलं का?

आता या प्रकरणी यवतमाळमधून धीरज देशमुखला अटक करण्यात आली आहे. तो मुळचा यवतमाळचाच आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो धर्मांतरण आणि त्याच्याशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी आहे. प्रसाद कावरे, कौसर आलम, भूप्रिय बिन्दो यांच्यासहीत तो त्याचं बेकायदा धर्मांतरणाचं काम करत होता अशीही माहिती मिळाली आहे. धीरजने Revert, Rehab and Dawah नावाचा What’s App ग्रुपही तयार केला होता. या माध्यमातून लोकांना विविध प्रलोभनं देणं, आमीषं दाखवणं किंवा धार्मिक तेढ पसरवून धर्मांतरण करायला लावणं अशा काही बाबी हा तरूण करत होता.

धीरजसह, फराज शाहच्या ग्रुप इस्लामिक युथ फेडरेशन यांचं मुख्य कार्य धर्मांतरण हेच होतं. तो कलीम सिद्दीकींसोबत देशव्यापी नेटवर्कमध्येही काम करत होता असंही समजलं आहे. लोकांना घाबरवून किंवा मग त्यांना आमीष दाखवून धर्मांतरण करण्यास धीरज भाग पाडत असे. धीरज, प्रकाश कावरे या दोघांनी मिळून धर्मांतरण करणाऱ्यांची बनावट कागदपत्रंही तयार केली होती. आज या तरूणाला अटक कऱण्यात आली आहे. गोविंद राव एटीएसच्या टीमने ही कारवाई केली आहे. धीरजला आता न्यायालयात हजर केलं जाईल.

22 सप्टेंबरला मौलान कलीम सिद्दीकीला अटक

मेरठ या ठिकाणाहून मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक करण्यात आली. मौलाना कलीम सिद्दीकी हे जमीयत-ए-वलीउल्लाहचेही अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कलीम सिद्दीकी यांची लिंक मुफ्ती काजी आणि उमर गौतम यांच्याशीही आहे. धर्मांतरण प्रकरणातच या दोघांनाही अटक झाली.

देशातलं सर्वात मोठं धर्मांतरणाचं सिडिंकेट चालवल्याचा गंभीर आरोप मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर आहे. शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि धार्मिक संस्थांच्या आडून बेकायदा धर्मांतरण करण्यात मौलाना कलीम सिद्दीकी यांचा मोठा वाटा आहे. देशपातळीवर ते हे काम करत होते असं यूपी एटीएसने म्हटलंय. त्यांना विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता असंही एटीएसने स्पष्ट केलं.

यूपी एटीएसने हा दावा केला आहे की भारतातील सगळ्यात मोठं धर्मांतरण सिंडिकेट चालवण्यात मौलाना कलीम यांचा हात होता. मुस्लिम नसणाऱ्यांची ते दिशाभूल करत होते आणि त्यांचं बेकायदा धर्मांतरण करत होते.

    follow whatsapp